देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सिंगलफेज लाईन तत्काळ सुरू करा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 9, 2025
in परभणी, मराठवाडा
0
सिंगलफेज लाईन तत्काळ सुरू करा
Please Share

सेलू तालुका दबाव गट संघटनेची राज्याच्या ऊर्जामंत्र्यांकडे मागणी

सेलू : सेलू तालुक्यातील ग्रामीण भागातील सिंगल फेज लाईन गेल्या काही दिवसांपासून बंद असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांनी वारंवार महावितरण कार्यालयात चकरा मारूनही अधिकाऱ्यांकडून कसलीही दाद मिळत नसल्याने, सेलू तालुका दबाब गट संघटनेने राज्याचे ऊर्जा मंत्री यांच्याकडे सिंगल फेज लाईन तत्काळ सुरू करण्याबाबत मागणीचे निवेदन सादर केले आहे.

महावितरण कार्यालयाच्या या तुघलकी कारभारामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे या वर्षी शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा महावितरणच्या निर्णयामुळे शेतकरी अधिकच त्रस्त झाले आहेत.अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या सोयाबीन पिकाची सध्या काढणी सुरू आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री शेतात पिकाच्या संरक्षणासाठी जावे लागते, तसेच जनावरे आखाड्यावर असतात. रात्रीच्या अंधारात वन्य प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी रात्रीच्या वेळी सिंगल फेज लाईन चालू असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, स्थानिक महावितरण अधिकारी वर्गाच्या मनमानी व तुघलकी कारभारामुळे शेतकरी वर्ग परेशान आहे.

याआधी सिंगल फेज लाईन बारा तास चालू असे. अतिवृष्टीच्या काळात बंद पडलेला वीज पुरवठा तत्काळ सुरू करा, असे शासनाचे आदेश असतानाही येथील अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आणि सोयाबीन पीक काढणी चालू असताना हा प्रकार सुरू आहे.त्यामुळे, या प्रकरणी महावितरण अधिकाऱ्यांना सेलू तालुक्यातील ग्रामीण भागातील सिंगल फेज लाईन बारा तास चालू ठेवण्याबाबत तात्काळ आदेश द्यावेत, अशी मागणी ऊर्जा मंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.या निवेदनावर श्रीकांत वाईकर, इसाक पटेल, ओमप्रकाश चव्हाळ, देवराव दळवे, योगेश सुर्यवंशी, अजित मंडलीक, विकास गादेवार, गुलाब पौळ, सतिश काकडे, भाऊराव सोनवणे, दिलीप मगर, मुकूंद टेकाळे, भारत झाल्टे, सुधीर आघाव, भारत रवंदळे, रामचंद्र कांबळे, उध्दव सोळंके, नारायण पवार, ज्ञानेश्वर लेवडे, राजेश बरसाले, महादेव लोंढे, विलास रोडगे, राजेंद्र केवारे, प्रकाश नाटक, परमेश्वर कादे, अक्षय बुरे, गणेश सोळंके, लिंबाजी कलाल, रौफ भाई, आबासाहेब भुजबळ, लक्ष्मण प्रधान, सुभाष काकडे, प्रकाश शिंदे, श्रीरंग डोईफोडे, रामेश्वर शेवाळे, दत्ता कांगणे, विठ्ठल काळे, परमेश्वर वीर आदींच्या सह्या आहेत.

Post Views: 1,445
Please Share
Previous Post

अत्याचारप्रकरणी शिक्षक निलंबित

Next Post

मातीच्या मैदानावरील कबड्डी मॅटवर

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मातीच्या मैदानावरील कबड्डी मॅटवर

मातीच्या मैदानावरील कबड्डी मॅटवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ