देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

देशात दिव्यांगांचा आत्मसन्मान वाढला

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 12, 2025
in परभणी
0
देशात दिव्यांगांचा आत्मसन्मान वाढला
Please Share

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रतिपादन, सेलूत माजी सभापती अशोक काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग मेळावा उत्साहात

सेलू (जि.परभणी) : पूर्वी वापरला जाणारा ‘अपंग’ हा शब्द वगळून ‘दिव्यांग’ हा सन्मानजनक शब्द वापरून त्यांच्या आत्मसन्मानात भर घालण्याचे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचे कार्य देशाचे संवेदनशील नेतृत्व असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे, असे प्रतिपादन राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सेलू येथे बोलताना केले.

परभणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोकराव काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त संघर्ष दिव्यांग समितीच्या वतीने अभिष्टचिंतन व दिव्यांग मेळावा साई नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संघर्ष दिव्यांग समितीचे अध्यक्ष किशोर साळवे होते, तर प्रा. राजाराम झोडगे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला मुख्याधिकारी तुकाराम कदम, के.बा. शिक्षण संस्थेचे सचिव महेशराव खारकर, बाजार समितीचे संचालक रामेश्वर राठी, ऍड. अशोकराव फोफसे, गोपाळ काबरा, दिनकर वाघ, सचिन धापसे, मनीष कदम, नरेंद्र दिशागत, रमेश दौड, बंडू मुळे, गोविंदराव गायकवाड, ज्योती मोगल, संध्या चिटणीस, पंकज निकम आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. मुख्याधिकारी कदम, प्रा. राजाराम झोडगे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कॉम्रेड अशोक उफाडे यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. शहरातील विविध संस्था, संघटना आणि असोसिएशनच्या प्रतिनिधींनी पुष्पहार, शाल आणि श्रीफळ देऊन अशोकराव काकडे यांचा सत्कार केला. कार्यक्रमाला दिव्यांग बांधव, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अतिवृष्टीग्रस्तांसाठी ५१ हजारांची मदत

सत्काराला उत्तर देताना अशोकराव काकडे म्हणाले की, दिव्यांग बांधवांसोबत जोडले जाणे हे माझे भाग्य आहे. गरजूंना मदत करणे यासारखा खरा आनंद दुसरा नाही. दिव्यांग हे मनाने सबळ असतात आणि त्यांच्या सर्व समस्या सोडवून त्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात उपस्थित सर्व दिव्यांगांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. कै. अण्णासाहेब काकडे सेवा भावी संस्थेच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५१,००० रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पालकमंत्री बोर्डीकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

Post Views: 1,321
Please Share
Previous Post

एचएआरसीतर्फे अनाथ बालकांना दिवाळी किट

Next Post

१५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
१५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

१५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ