देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

वेदांमुळेच मानवी जीवन सुरक्षित

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 27, 2025
in मराठवाडा
0
वेदांमुळेच मानवी जीवन सुरक्षित
Please Share

स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांचे प्रतिपादन; श्रीमद् भागवत महापुराण कथेला भाविकांची मोठी उपस्थिती

सेलू जि.परभणी : मराठवाडा आणि विदर्भातील भाविकांच्या वतीने श्रीक्षेत्र जगन्नाथ पुरी धाम येथे श्रीमद् भागवत महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी, २७ डिसेंबर रोजी कथा सूत्र प्रतिपादन करताना स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी वेदांचे महत्त्व विशद केले. वेदांचे पालन आणि रक्षण करणारा मनुष्य आजीवन सुरक्षित राहू शकतो, असे त्यांनी या वेळी आवर्जून सांगितले.

बालियापांडा येथील इंद्रद्युम्ननगरीमध्ये १ जानेवारी २०२६ पर्यंत चालणाऱ्या या कथा सोहळ्याचे आयोजन राधेश्याम चांडक (बुलडाणा), नंदकिशोर झंवर (रिसोड), डॉ. विनोद मंत्री (परभणी) आणि नंदकिशोर बाहेती (सेलू) व त्यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. स्वामीजींनी आपल्या प्रवचनात कौरव आणि पांडवांच्या वंशाचा संदर्भ दिला. अस्त्रांचा प्रयोग मंत्रांच्या साहाय्याने कसा केला जात असे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. वेदांच्या माध्यमातूनच भारतीय ऋषीमुनींच्या शक्तीची महत्ता लक्षात येते, असेही त्यांनी नमूद केले. जे काही इष्ट आहे ते सुंदरच वाटले पाहिजे, असा विचार त्यांनी या वेळी मांडला.

अध्यात्म आणि ईश्वरी चिंतनावर भाष्य करताना स्वामीजी म्हणाले की, प्रत्येकाने प्रभूच्या चरणकमलांचे चिंतन केले पाहिजे. कथेमध्ये चरणकमलांच्या कोमलतेचे विशेष वर्णन येते. चित्तामध्ये कोमलता असल्याशिवाय अध्यात्म घडू शकत नाही आणि अशा कोमल चित्ताशिवाय भगवंताचे आगमनही होत नाही. प्रभूच्या करकमलांमध्ये चक्र असून त्यांच्या आयुधांचे चिंतन केल्याने कोणाच्या आयुष्यात काहीही बिघाड होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भगवंताच्या मुखारविंदावरील अनुकंपा आणि त्यांच्या नेत्रांमधील अखंड करुणा भाव भक्ताला शांतता प्रदान करतो. याच अनुकंपेमुळे जगन्नाथ भगवान साऱ्या संसाराचे भरण-पोषण करत असतात. संतांच्या सान्निध्यात राहून जेव्हा आपले चिंतन परमात्म्याशी एकरूप होते, तेव्हाच खऱ्या अर्थाने मनुष्याचे स्वरूप बदलत जाते, असे स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संबीत पात्रा, ओडिशा भाजपचे कोषाध्यक्ष अजय अग्रवाल यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरती झाली. सूत्रसंचालन कांचन बाहेती यांनी केले. या सोहळ्याला भाविकांची मोठी उपस्थिती होती.

संघर्षाने समृद्ध जीवनगाथाच मोठी : खासदार संबीत पात्रा

ज्याच्या जीवनात संघर्ष नाही, ते जीवन खरे जीवनच नाही. आयुष्याच्या शेवटी जेव्हा माझ्या जीवनाचे पुस्तक लिहिले जाईल, तेव्हा ते केवळ दोन पानांचे नसावे, तर संघर्षाने समृद्ध असावे. जीवनात खूप संघर्ष केला, अनेक अडचणी सोसल्या आणि भगवंताचे स्मरण करत सतत काम केले, तरच ती जीवनरूपी गाथा महान ठरते, असे प्रतिपादन खासदार संबीत पात्रा यांनी केले.खासदार पात्रा पुढे म्हणाले की, २१ व्या शतकात ज्याकडे एक महामंत्र म्हणून पाहिले जाईल, ते म्हणजे अयोध्या नगरीत भगवान श्री राम जन्मस्थळी निर्माण झालेले भव्य राम मंदिर होय. २१ व्या शतकातील या महायज्ञात स्वामी गोविंद देव गिरीजी महाराजांचा सक्रिय सहभाग आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

Post Views: 2,251
Please Share
Previous Post

श्रीमद् भागवत महापुराण कथेला उत्साहात प्रारंभ

Next Post

संघर्षाने समृद्ध जीवनगाथाच मोठी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
संघर्षाने समृद्ध जीवनगाथाच मोठी

संघर्षाने समृद्ध जीवनगाथाच मोठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ