देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

६५ जागांसाठी ४११ उमेदवार रिंगणात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 2, 2026
in परभणी
0
६५ जागांसाठी ४११ उमेदवार रिंगणात
Please Share

परभणी महानगरपालिका निवडणूक : १९७ उमेदवारांची माघार, बहुतांश ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढतीचे चित्र

परभणी | प्रतिनिधी : परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण १६ प्रभागांतील ६५ जागांकरिता प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अन्य पक्ष व अपक्ष असे एकूण ४११ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. छाननी प्रक्रियेतून ६०८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत शुक्रवारी, २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण १९७ उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे आता १६ प्रभागांतील एकूण ६५ जागांकरिता लढतीचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १ मधून २२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते, त्यापैकी १० उमेदवारांनी माघार घेतल्याने आता १२ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक २ मधून २६ पैकी ९ उमेदवारांनी माघार घेतली असून आता १७ उमेदवार उरले आहेत. प्रभाग क्रमांक ३ मधून ३७ अर्ज वैध ठरले होते, त्यातील १६ जणांनी माघार घेतल्याने २१ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. प्रभाग क्रमांक ४ मधून ३७ उमेदवारांपैकी १० जणांनी माघार घेतली असून आता २७ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक ५ मधून २६ पैकी ४ उमेदवारांनी माघार घेतल्याने २२ उमेदवार उरले आहेत. प्रभाग क्रमांक ६ मधून ४७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते, त्यापैकी सर्वाधिक २३ उमेदवारांनी माघार घेतली असून आता २४ उमेदवार रिंगणात आहेत.प्रभाग क्रमांक ७ मधून ४५ पैकी १७ उमेदवारांनी माघार घेतली असून आता २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक ८ मधून ३४ पैकी १५ जणांनी माघार घेतल्यामुळे १९ उमेदवार उरले आहेत. प्रभाग क्रमांक ९ मधून ३५ पैकी १३ उमेदवारांनी माघार घेतली असून आता २२ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक १० मधून ३६ पैकी १० उमेदवारांनी माघार घेतल्याने २६ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. प्रभाग क्रमांक ११ मधून ३० पैकी ८ उमेदवारांनी माघार घेतली असून आता २२ उमेदवार रिंगणात आहेत.प्रभाग क्रमांक १२ मधून ४८ पैकी १२ उमेदवारांनी माघार घेतल्याने ३६ उमेदवार मैदानात आहेत. प्रभाग क्रमांक १३ मधून ४५ पैकी १० जणांनी माघार घेतली असून आता ३५ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक १४ मधून ४९ पैकी १७ उमेदवारांनी माघार घेतली असून ३२ उमेदवार उरले आहेत. प्रभाग क्रमांक १५ मधून ४८ पैकी १३ जणांनी माघार घेतल्याने ३५ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. तर प्रभाग क्रमांक १६ मधून ४३ पैकी १० उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.तिरंगी, चौरंगी लढतीचे चित्र परभणी महानगरपालिका निवडणुकीत एकूण ६०८ वैध उमेदवारांपैकी गुरुवारी ३५ व शुक्रवारी १६२ अशा एकूण १९७ उमेदवारांनी माघार घेतली असून आता ४११ उमेदवारांमध्ये प्रत्यक्ष लढत होणार आहे. बहुतांश प्रभागात तिरंगी, चौरंगी लढतीचे चित्र आहे.

Post Views: 1,537
Please Share
Previous Post

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांची कृषी विभागाच्या कामकाजाची झाडाझडती

Next Post

वाळूची अवैध वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
वाळूची अवैध वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त

वाळूची अवैध वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ