देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

विश्वास वसेकर यांच्या ‘अहल्या’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 15, 2026
in महाराष्ट्र
0
विश्वास वसेकर यांच्या ‘अहल्या’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
Please Share

‘अहल्या’ खंडकाव्य म्हणजे स्त्रीवादावरचे प्रभावी भाष्य : ज्येष्ठ समीक्षक अश्विनी धोंगडे

पुणे : ‘अहल्या’ हे खंडकाव्य हिंदीचा अनुवाद नसून मराठीतच लिहिल्यासारखे वाटावे इतके उत्तम आणि सूचक आहे. हे काव्य म्हणजे स्त्रीवादावरचे भाष्य असल्याची भावना ज्येष्ठ समीक्षक अश्विनी धोंगडे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ साहित्यिक विश्वास वसेकर यांच्या ‘अहल्या’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनावेळी अध्यक्षपदावरून धोंगडे बोलत होत्या. ‘सकाळ’च्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन १२ जानेवारी रोजी करण्यात आले.

यानिमित्ताने धोंगडे यांनी ‘अहल्या’ या शब्दाचा नेमका अर्थ उलगडून तिचा जीवनप्रवास सांगितला. त्याचबरोबर तिच्या आयुष्यातल्या अवस्था काव्यात कशा उमटल्या आहेत, ते स्पष्ट केले. धोंगडे पुढे म्हणाल्या की, एका पुरुषाने हे काव्य लिहूनही स्त्रीची वेदना आणि तिचे मन ओळी-ओळींमधून व्यक्त झाले आहे. मूळ हिंदी कवी बलदेव वंशी आणि ज्यांनी मराठीत हे खंडकाव्य आणले ते विश्वास वसेकर यांनी ‘स्त्रीची वेदना मांडायला स्त्रीच हवी’ हे समीकरण खोटे पाडले आहे. या काव्यसंग्रहातील निसर्गाचे वर्णनही विलोभनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, ‘गुरू’ कादंबरीला पुरस्कार मिळाल्याबद्दल लेखक नितीन कोत्तापल्ले यांचा ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. वाचकांच्या प्रतिनिधी म्हणून साहित्यिक वंदना बोकील-कुलकर्णी यांना पुस्तकाची प्रत देण्यात आली. या कार्यक्रमात डॉ. मीनाक्षी पाटील, सुनीताराजे पवार, डॉ. वर्षा तोडमल यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. नितीन कोत्तापल्ले यांनी आभार मानले.

या सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कवी विश्वास वसेकर व प्रकाशक नितीन कोत्तापल्ले हे पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत प्रेक्षकांमध्ये बसून होते. व्यासपीठावर फक्त वक्ते आणि अध्यक्ष उपस्थित होते. ‘अहल्या’ हे स्त्रीवादावर भाष्य करणारे पुस्तक असल्याने सर्व महिलांना त्यांनी मनोगत व्यक्त करण्यास सांगितले आणि स्वतः श्रोत्याची भूमिका बजावली. लेखक आणि प्रकाशकांच्या या वेगळ्या कृतीचे सर्व महिला वक्त्यांनी आवर्जून कौतुक केले.

Post Views: 1,784
Please Share
Previous Post

पोस्टाच्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा

Next Post

सेलू तालुक्यात १ लाख २ हजार मतदार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणी जिल्ह्यात १,२२२ जणांचे अर्ज वैध

सेलू तालुक्यात १ लाख २ हजार मतदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ