परभणी : वैश्विक मांगल्याशी कटिबध्द होऊन माणुसकीचा मळा फुलविण्यासाठी विद्रोहाचा आवाज बुलंद केला पाहिजे असे आवाहन विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लोकनाथ यशवंत यांनी केले.विद्रोही सांस्कृतिक चळवळ,परभणी आणि युगांधर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित सत्काराला ऊत्तर देतांना सावली सभागृह येथे ते बोलत होते.या वेळी पुढे बोलतांना त्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात स्वताला झोकुण दिले तरच सर्वोत्तम निर्मिती होते अशा भावना व्यक्त केल्या.
“जेलर बिनधास्त झोपी गेला
कारण कैदी ऐकमेकांवर नजर ठेऊन आहेत” ही कविता त्यांनी सादर केली.
या वेळी अध्यक्षस्थानी प्रा.डाॅ.सुरेश शेळके तर प्रमुख अतिथीस्थानी इंजी.विवेक मवाडे,विधिज्ञ एल.आर.साबळे,प्रा.डाॅ.सुधिर इंगळे,डाॅ.अनिल कांबळे,जि.प.सदस्य गणेश घाडगे,प्रा.डाॅ.ज्ञानदेव ऊफाडे,प्रा.डाॅ.डी.बी.मुंढे,कमळाजी कावडे (आधुनिक गाडगे बाबा) ऊपस्थित होते.
दुस-या सत्रात कवीसंमेलनातुन विद्रोहाचे अंगार फुलले. विद्रोहीचे राज्य सचिव यशवंत मकरंद यांनी
त्यांनी मध्ये पडू नये
ज्यांचा पोटासाठी गहाण मेंदु
आम्ही पारखुण घेतलय
कोण साधु कोण भोंदु…
ही रचना सादर केली.
संतोष नारायण कर यांनी अशीच
त्यांनी एकदा माझी विचारली होती जात,मी म्हणालो दोन पाय,दोन हात.. या कवितेतुन समतामुलक समाजाशी आपली नाळ जोडली तर विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य ऊपाध्यक्ष प्राचार्य डाॅ. विठ्ठल घुले यांनी भुछत्रे ऊगवावी त्याप्रमाणे नेते ऊगवतात हल्ली,त्यांच्या वाढदिवसाचे पोस्टर गल्लोगल्ली,मोर्चा,ऊपोषण कधी केले का? तेवढे मात्र विचारु नका हे वास्तव अधोरेखित केले. इंजी विवेक मवाडे यांनी
आमच्या मात्र अब्रूंची नीलामी होते भर चौकात इम्पोर्टेड फर्निचरच्या लिलावासारखे..!
या शब्दात विद्रोह व्यक्त केला.
संजय बगाटे यांनी मला शोधू नका, इकडे तिकडे..
पुस्तकातच असतो मी
मग, तुम्हीच म्हणाल
बाबा तुम्हाला
पुतळ्यामध्येच शोधात होतो
मग, सांगा कुठे चुकलो होतो.
या कवितेतुन रसिकांना अंर्तमुख केले.कवी संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ कवी एम.एम.भरणे यांनी कुठे लपला चौकीदार ? या कवितेतुन
जाहीरनाम्यात सिध्द झाले
एक एक जुमले
घोषणेचे खोटे सारे
एक एक मामले. अशा भावना व्यक्त केल्या. ऊशिरा पर्यंत रंगलेल्या या द्रोही कवी संमेलनात जेष्ठ कवी दि.फ.लोंढे,प्रा.डाॅ.भास्कर गायकवाड,प्रा.डाॅ.आनंद इंजेगावकर,प्रा.डाॅ. गौतम वाघमारे,
प्रा.शंकर कदम,त्रिवेणी पाटील,स्वरलक्ष्मी लहाणे,विश्वजित वाघमारे,एम.एम.बरे,शायर गर्दिश,कारभारी हजारे, शाहिर शिवाजी सुगंधे यांनी आपल्या रचना सादर केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष डाॅ.सुनिल जाधव यांनी तर आभार प्रदर्शन संयोजक संजिव आढागळे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवी पंडीत,प्रा.डाॅ.चंद्रकांत गांगुर्डे, बाबासाहेब पंचांगे,भुषण मोरे,शुभम धाडवे,काॅ.प्रशांत गोरे,इर्शाद पाशा,शेख सोहेल,प्रफुल्ल थोरात आदिंनी परिश्रम घेतले.





