देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

उज्ज्वल भविष्यासाठी मोबाईलची गुलामी झुगारा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
in परभणी
0
उज्ज्वल भविष्यासाठी मोबाईलची गुलामी झुगारा
Please Share

डॉ.मनीषा घांडगे यांचे आवाहन, सेलूतील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या गुणवंतांचा सत्कार

सेलू : “आजच्या काळात सामाजिक माध्यम ही मनं विचलित करीत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञान, मोबाईल आणि सोशल मीडियाच्या दुष्टचक्रात स्वतःला अडकवून ठेवू नका. मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी नियमित व्यायाम आणि ध्यान धारणा करा. मोबाईल, सोशल मीडियाची ही सतत वाढती गुलामी झुगारत, आत्मविश्वासाने उज्ज्वल भविष्य घडवा,” असे आवाहन डॉ.मनीषा घांडगे यांनी केले.

सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा ८७ वा वर्धापन दिन, दलितमित्र श्रीरामजी भांगडीया स्मृतिदिनानिमित्त नूतन कन्या प्रशालेच्या कै. सौ. कमलाबाई आसारामजी बाहेती सभागृहात शुक्रवारी, ३ जुलै २०२६ रोजी आयोजित गुणवंतांच्या सत्कारप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी, बालरोगतज्ञ डॉ. सत्यनारायण सोमाणी (परभणी) आणि डॉ.मनीषा घांडगे-डोंबे (सेलू) यांची उपस्थिती होती. संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, डॉ. विजेंद्र नागोरी, शालेय समिती अध्यक्ष नंदकिशोर बाहेती, सीताराम मंत्री, प्राचार्य डॉ.उत्तम राठोड, मुख्याध्यापक संतोष पाटील, नरेंद्र पाटील, उल्हास पांडे आणि निशा पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.घांडगे म्हणाल्या, “पालकांनी मुलांचा कल ओळखून त्यांना त्यांच्या आवडीचे अभ्यासक्षेत्र निवडू द्यावे. आपल्या इच्छांचे ओझे पाल्यांवर लादू नये आणि त्यांची इतरांशी तुलना करू नये.” या कार्यक्रमात संस्थेतील १०९ गुणवंत विद्यार्थी, खेळाडू आणि शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर यांनी केले. वार्षिक अहवाल जयप्रकाश बिहाणी यांनी सादर केला. सूत्रसंचालन अतुल पाटील यांनी केले, निशा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक पी.टी.कपाटे, पर्यवेक्षक डी.बी.घोगरे, शंकर बोधनापोड, गणेश माळवे, भालचंद्र गांजापूरकर, शशिकांत देशपांडे, डॉ.यशवंत कुलकर्णी, अशोक लिंबेकर, बाबासाहेब हेलसकर, सच्चिदानंद डाखोरे, पूजा महाजन, किशोर कटारे, ज्योती कुंभकर्ण, बी.आर.पानझाडे, डॉ.सुरेश हिवाळे, डॉ.भाग्यश्री धामणगावकर आदींसह नूतन कन्या प्रशालेतील तसेच संस्थेतील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

‘नूतन’ हे विद्यार्थी घडविणारे संस्कार केंद्र : डॉ. सत्यनारायण सोमाणी

“नूतन विद्यालय शिक्षण संस्थेने मूल्ये आणि सामाजिक जाणीवांतून हजारो विद्यार्थी घडवले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे हे एक संस्कार केंद्र आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ध्येयवादी व्हावे. अभ्यास व परिश्रमातून मिळालेल्या यशाने आई-वडील, स्वतःचे आणि संस्थेचे नाव मोठे करावे,” असे प्रतिपादन डॉ. सत्यनारायण सोमाणी यांनी केले

Post Views: 1,562
Please Share
Previous Post

धन्वंतरी ज्ञानाई वारकरी दिंडीचे प्रस्थान

Next Post

हात मदतीचा : २७९३ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
हात मदतीचा : २७९३ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

हात मदतीचा : २७९३ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विवेकानंद विद्यालय : ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

विवेकानंद विद्यालय : ६ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 5, 2026
0

धनंजय चौधरी जिल्ह्यात १२ वा, तर मधुर कुलकर्णी २१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण; गुणवंतांचे सर्व स्तरांतून कौतुक सेलू/प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य परीक्षा...

भाजप युवा मोर्चा सेलू शहराध्यक्षपदी ठाकूर

भाजप युवा मोर्चा सेलू शहराध्यक्षपदी ठाकूर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 5, 2026
0

सेलू : भारतीय जनता पार्टी सेलू युवा मोर्चाच्या शहराध्यक्षपदी नागेश गणेशसिंह ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर...

केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

केमापूर येथे कृषी दिन उत्साहात साजरा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
0

कृषी महाविद्यालय सेलूच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; प्रभात फेरी आणि वृक्षारोपणाने वेधले ग्रामस्थांचे लक्ष केमापूर : हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या...

कुंडी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

कुंडी येथील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 4, 2026
0

बोर्डीकर कृषी महाविद्यालयाचा कृषी दिनानिमित्त उपक्रम कुंडी (ता. सेलू) : सेलू येथील बोर्डीकर कृषी महाविद्यालयातर्फे हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ