देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

गणेशराव रोकडे यांचे सोसायटी सभासदत्व पूर्ववत

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 29, 2026
in परभणी
0
गणेशराव रोकडे यांचे सोसायटी सभासदत्व पूर्ववत
Please Share

विभागीय सहनिबंधकांचा मोठा दिलासा

राजकीय षडयंत्रातून झालेली कारवाई नियमबाह्य; निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी न्यायालयात जाणार : रोकडे यांचा इशारा

देशनिष्ठ प्रतिनिधी, पालम : पालम येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांनी दि. १३/५/२०२६ रोजी गणेशराव रोकडे यांचे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सभासदत्व रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाविरोधात रोकडे यांनी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे अपील दाखल केले होते. या अपिलात त्यांचे सभासदत्व कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक गणेशराव रोकडे यांनी दि. २८ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पुढे बोलताना रोकडे म्हणाले की, स्थानिक राजकीय पुढार्‍यांच्या दबावातून पालम येथील सहाय्यक निबंधकांनी वाडी खुर्द येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माझे सभासदत्व नियमबाह्य पद्धतीने रद्द केले होते. हे सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई केवळ मला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपासून रोखण्यासाठी करण्यात आलेला खटाटोप होता, असा थेट आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.याच अन्यायाविरोधात विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे अपील करण्यात आले होते. अपिलाच्या अनुषंगाने विभागीय सहनिबंधकांसमोर प्रत्यक्षात झालेल्या सुनावणीत विविध मुद्द्यांची पडताळणी करण्यात आली. यात नियम २१ व नियम ४५ चे पालन झाले अथवा नाही, तसेच कलम ११ अंतर्गत पात्रतेबाबत उपलब्ध सर्व पुराव्यांचे सखोल मूल्यांकन करण्यात आले. प्रत्येक मुद्द्यावर स्वतंत्र नोंद घेत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० (व नियम १९६१) तसेच संबंधित संस्थेच्या पोटनियमांच्या (उपविधी) अनुषंगाने सकारण आदेश पारित करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत, रोकडे यांच्यावर करण्यात आलेली कारवाई नियमबाह्य असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच त्यांचे सदस्यत्व कायम ठेवण्याचे आदेश दि. ९ जुलै रोजी पारित करण्यात आले आहेत.

चुकीच्या कारवाईविरोधात न्यायालयात लढा उभारणार : रोकडे

पालम येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांनी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता न करता माझ्याविरोधात षडयंत्र रचून चुकीच्या पद्धतीने कारवाई केली. त्यांच्या या चुकीमुळे मला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपासून रोखण्याचे काम झाले आहे. या संपूर्ण प्रक्रियेविरोधात आणि झालेली निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी मी न्यायालयात लढा लढविणार असल्याचे गणेशराव रोकडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Post Views: 1,320
Please Share
Previous Post

वनाकृविचा राष्ट्रीय स्तरावर गौरव : नॅशनल ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशात १८ वे स्थान

Next Post

रेड अलर्ट : परभणी जिल्ह्यातील नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
रेड अलर्ट : परभणी जिल्ह्यातील नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा

रेड अलर्ट : परभणी जिल्ह्यातील नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२० कोटींच्या विकासकामांना मंजुरी

२० कोटींच्या विकासकामांना मंजुरी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 30, 2026
0

परभणी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध मुद्द्यांवर चर्चा परभणी : परभणी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा यांच्या अध्यक्षतेखाली...

रेड अलर्ट : परभणी जिल्ह्यातील नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा

रेड अलर्ट : परभणी जिल्ह्यातील नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 30, 2026
0

परभणी : भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार परभणी जिल्ह्यासाठी दिनांक ३० जुलै २०२६ रोजी वादळी वारे, विजांचा...

गणेशराव रोकडे यांचे सोसायटी सभासदत्व पूर्ववत

गणेशराव रोकडे यांचे सोसायटी सभासदत्व पूर्ववत

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 29, 2026
0

विभागीय सहनिबंधकांचा मोठा दिलासा राजकीय षडयंत्रातून झालेली कारवाई नियमबाह्य; निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी न्यायालयात जाणार : रोकडे यांचा इशारा देशनिष्ठ...

वनाकृविचा राष्ट्रीय स्तरावर गौरव : नॅशनल ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशात १८ वे स्थान

वनाकृविचा राष्ट्रीय स्तरावर गौरव : नॅशनल ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशात १८ वे स्थान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 29, 2026
0

'गोल्ड' रेटिंग प्राप्तग्रीन मेंटर्सतर्फे पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय दखल परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ