देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याची सुखरूप सुटका

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 19, 2026
in परभणी
0
बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याची सुखरूप सुटका
Please Share

थरारक रेस्क्यू, जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारातील घटना, ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या अथक परिश्रमाला यश

परभणी : जिल्ह्यातील बोरी (ता.जिंतूर) येथून जवळच असलेल्या कौसडी शिवारातील शेतात बोअरवेलच्या खड्डयात पडलेल्या तीन वर्षीय बालकाला अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थ आणि प्रशासनाला बुधवारी, १९ ऑगस्ट रोजी यश आले. आदनान नदीम शेख असे या बालकाचे नाव असून त्यास पुढील उपचारासाठी तातडीने परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास कौसडी शिवारातील गट क्रमांक २५ मध्ये ही घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, बालक आईसोबत शेतात गेले होते. शेतात कामे सुरू असताना बालक बोअरवेलच्या खड्डयात पडल्याचे निदर्शनास आले. घटना घडल्याचे लक्षात येताच आई व नातेवाईकांनी आरडाओरड केली. त्यानंतर भ्रमणध्वनीद्वारे गावात माहिती देण्यात आली. काही वेळातच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. आणि बचाव कार्याला सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच आरोग्य, महसूल प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कौसडी, बोरी, जिंतूर तसेच परभणी येथील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन युद्धपातळीवर रेस्क्यू मोहीम सुरू करण्यात आली. जिल्हा प्रशासनानेही घटनेची गंभीर दखल घेत बचावकार्याला आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार हे स्थानिक प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात राहून बचावकार्याचा आढावा घेत होते. कौसडीचे सरपंच शेख मोबीन, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी बचावकार्यात मोठे योगदान दिले. परिसरातील विविध गावांमधून नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते.

तीन वर्षीय शेख अदनान हा बालक बोअरवेलमध्ये पडल्याची घटना बुधवारी सव्वा एकच्या सुमारास घडली. माहिती मिळताच तालुका, जिल्हा प्रशासन, महसूल, पोलिस प्रशासन, आरोग्य विभागाचे पथक यांनी समन्वय साधून तसेच ग्रामस्थांच्या अथक परिश्रमानंतर बालकाची दीड तासात सुटका करण्यात आली. यासाठी परिसरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी आवश्यक ती मदत करत मशिनरी उपलब्ध करून दिली. या शिवाय ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली होती. कुटुंबियांशी संपर्कात राहून त्यांचा आत्मविश्वास वाढविला गेला. बोअरवेलच्या दोन्ही बाजूने खड्डे खोदून साधारण दहा फूट खोलीपर्यंत असलेल्या अदनानला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. – शैलेश लाहोटी,उपविभागीय अधिकारी, सेलू

Post Views: 1,236
Please Share
Previous Post

ईश्वराला सोबत ठेवून कर्म श्रेष्ठ बनवा : ब्रह्माकुमारी वैशाली बहन

Next Post

सुवर्णकार महिला मंडळाकडून शालेय साहित्य वाटप

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सुवर्णकार महिला मंडळाकडून शालेय साहित्य वाटप

सुवर्णकार महिला मंडळाकडून शालेय साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ