देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सुवर्णकार महिला मंडळाकडून शालेय साहित्य वाटप

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 19, 2026
in परभणी
0
सुवर्णकार महिला मंडळाकडून शालेय साहित्य वाटप
Please Share

श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात वंचित व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहाय्य

सेलू : येथील केशवराज बाबासाहेब विद्यालयात सुवर्णकार महिला मंडळ सेलूच्या वतीने गरीब, वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील २१ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर सुवर्णकार महिला मंडळाच्या अध्यक्षा रोहिणी राजूरकर, मंगल सराफ, मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके, संजय धारासुरकर आदींसह सुवर्णकार महिला मंडळाच्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सेलूचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

प्रास्ताविकात रोहिणी राजूरकर यांनी सांगितले की, दरवर्षी संत नरहरी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम महिला मंडळाच्या वतीने राबविले जातात. यावर्षी आपल्या विद्यालयात हा उपक्रम होत असल्याचा विशेष आनंद त्यांनी व्यक्त केला. तसेच शाळेने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये व १० वीच्या निकालात मिळवलेल्या उत्कृष्ट यशाबद्दल मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे कौतुक केले.

याप्रसंगी संजय धारासुरकर व सिद्धार्थ एडके यांनी या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा देऊन महिला मंडळाचे मनापासून आभार मानले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जयश्री सोन्नेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृष्णा पांचाळ, सुचिता पितळे, कीर्ती कुलकर्णी, योगेश ढवारे, शुभांगी भाग्यवंत, रूपाली कुर्डे, सेवक अण्णासाहेब गायकवाड, श्यामसुंदर मुंडे, बाबासाहेब बदाले आदींनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,425
Please Share
Previous Post

बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याची सुखरूप सुटका

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्थांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
स्थानिक स्वराज्य संस्थांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

स्थानिक स्वराज्य संस्थांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ