देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

उद्धव ठाकरे शिवसेनेचे डफळे बजाव आंदोलन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 4, 2026
in वाशिम
0
उद्धव ठाकरे शिवसेनेचे डफळे बजाव आंदोलन
Please Share

मंगरूळपीर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

वाशिम: मंगरूळपीर तालुक्यात पावसाने मोठी दांडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर गंभीर संकट ओढवले आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले सोयाबीन पीक पावसाअभावी वाळून जात असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने झोपलेल्या सरकारला,प्रशासनाला डफळे बजाव आंदोलन करून जागे करण्याचा प्रयत्न केला.यावेळी मंगरूळपीर तालुक्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

मागील महिन्यापासून तालुक्यात पाऊस झाला नसल्याने शेतातील पिकांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.दरवर्षीच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात तालुक्यात केवळ 15.10 टक्के पावसाची नोंद झाली असे निवेदनात म्हटले आहे.पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने तालुक्यातील सोयाबीनसह इतर पिके वाळून गेली आहेत.शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी बियाणे,खते, कीटकनाशके, मशागत व इतर शेतीकामांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. मात्र, पीक वाढीच्या तसेच उत्पादनाच्या निर्णायक टप्प्यावरच पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. आधीच वाढते उत्पादन खर्च आणि विविध आर्थिक अडचणींनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता दुबार आर्थिक संकट उभे राहिले आहे.यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी, मंगरूळपीर यांना देण्यात आले. निवेदनामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी करण्यात आली असून, प्रति हेक्टर एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती लागू कराव्यात, पिक विम्याचा लाभ तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ तातडीने मिळवून द्यावा, अशीही मागणी करण्यात आली.पावसाअभावी झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडले असून,शासनाने तातडीने हस्तक्षेप करून ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने स्पष्ट केले की, हा लढा कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नसून शेतकऱ्यांच्या हक्काचा आणि न्यायाचा आहे.दरम्यान,शासनाने व प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही,तर शेतकऱ्यांच्या वतीने लोकशाही मार्गाने आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.यावेळी जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे,प्रशांत सुर्वे,सचिन परळीकर,बंडूभाऊ भिकाजी वैद्य,अनिताताई सिरसोदे,अर्जुन भीमराव सुर्वे,निखिल इंगोले,भागवत शिंदे,शिवा सावके,विलास लांभाडे,सुभाष शिंदे,अशोक हांडे,ओम इंगळे,राहुल माळी,विलास लांभाडे,भास्कर मुळे,ज्ञानू भडांगे,गजानन आसरे,महेंद्र भाऊ ठाकरे,रामराव वाघमारे,प्रकाश अपूर्वा,दीपक वानखडे,संतोष मांडवगडे,योगेश जाधव,पंकज राऊत,नरेंद्र भोयर,पिंटू नरवडे,दिनेश तेलंग,साहेबराव बेंद्रे,राम बोथे,संगम कुरळे,बाळकृष्ण रोकडे,दिलीप राऊत,अरुण उजने,प्रवीण मिसाळ,विनोद वैद्य,राम चौधरी,किशोर गावंडे,नितेश खडसे,गौरव बोरकर,प्रवीण गायकवाड, पाचू गायके,सईद भाई,नावेद,मंगेश साळवे,रवी राऊत,शेखर ठाकरे,संदीपान भगत,संतोष पवार,वेदांत शर्मा,गौरव गिरधर,वासुदेव वासुदेव डोंगरे,पंजाब महाजन,पुरुषोत्तम भुजाडे,विकी मसानकर, गणेश राऊत,वैभव लुंगे, विठ्ठल लांभाडे,यज्ञेश पाटील,मोहन सावके यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 10
Please Share
Previous Post

वाय.सी. सीबीएसई स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात

Next Post

आप्पास्वामी ज्यु. कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांची जि.प. शिक्षक पदी निवड

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
आप्पास्वामी ज्यु. कॉलेजच्या  दोन विद्यार्थ्यांची जि.प. शिक्षक पदी निवड

आप्पास्वामी ज्यु. कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांची जि.प. शिक्षक पदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ