देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

महेश नवमीनिमित्त सेलूमध्ये आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 23, 2026
in परभणी, सामाजिक
0
महेश नवमीनिमित्त सेलूमध्ये आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद
Please Share

सेलू तालुका माहेश्वरी युवा संघटना व माहेश्वरी सभेचा उपक्रम; १०१ जणांचे स्वेच्छेने रक्तदान, ३२१ नागरिकांची आरोग्य तपासणी

सेलू : माहेश्वरी समाजाचा पवित्र सण ‘महेश नवमी’चे औचित्य साधून सेलू तालुका माहेश्वरी युवा संघटना आणि माहेश्वरी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक श्री बालाजी मंदिर परिसरात रविवार, २१ जून २०२६ रोजी भव्य रक्त तपासणी, रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि जागरूकता या उद्देशाने आयोजित केलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

अत्यंत उत्साही वातावरणात आणि व्यापक लोकसहभागातून हे शिबीर संपन्न झाले. या भव्य शिबिरात सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात रक्त तपासणीसाठी एकूण ३२१ लोकांनी आपले नमुने दिले, तर रक्तदान शिबिरात १०१ दात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून मानव सेवेचा एक उत्कृष्ट आदर्श समाजासमोर सादर केला. शिबिरात उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने सर्व लाभार्थ्यांची सखोल तपासणी करून त्यांना आरोग्याविषयी मोफत सल्ला व योग्य मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तेथील कडक शिस्त, सुनियोजित व्यवस्थापन आणि कार्यकर्त्यांचे सांघिक कार्य (टीम वर्क) हे होते. शिबिरात आलेल्या लाभार्थ्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, एवढ्या सुव्यवस्थित आणि उच्च दर्जाच्या शिबिराचा अनुभव त्यांना जणू एखाद्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आल्यासारखा वाटला. सेलू तालुका माहेश्वरी युवा संघटनेच्या टीमने आपले समर्पण, मेहनत आणि स्मार्ट वर्कच्या जोरावर शिबिर यशस्वी केले.

याप्रसंगी श्री बालाजी मंदिराचे विश्वस्त आणि समाजातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती, यामध्ये प्रामुख्याने नंदकिशोरजी बाहेती, रतनजी दायमा, विजयकुमारजी बिहानी, नवलकिशोरजी काबरा, सीतारामजी मंत्री, डॉ. विजेंद्रजी नागोरी, अनिलजी शर्मा, मदनलालजी कर्वा, राजेशजी गुप्ता, शिवनारायणजी मालाणी, भागीरथजी सारस्वत, सतीशजी बाहेती, सीए सर्वेशजी काबरा आणि सेलू राजस्थान महिला मंडळाच्या वतीने उज्ज्वला भाला यांचा समावेश होता. या शिबिरात शहर व परिसरातील विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली अमूल्य सेवा दिली, ज्यामध्ये डॉ. अनुप गिल्डा, डॉ. शैलेश मालाणी, डॉ. योगिता मालाणी, डॉ. सुदर्शन मालाणी, डॉ. रुपाली मालाणी, डॉ. रूपेश डोडिया, डॉ. शीतल डोडिया, डॉ. राधिका शुभम काबरा, डॉ. युतिका भूतडा, डॉ. अर्पिता मालाणी आणि आहारतज्ज्ञ साक्षी बाहेती यांनी रुग्णांची तपासणी करून विशेष योगदान दिले.

हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी सेलू तालुका माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष अर्पण विपिन मंत्री यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष अनुज भुतडा, सचिव विनीत मालाणी, कोषाध्यक्ष राज लोया, संघटन मंत्री कृष्णा बाहेती आणि सर्व सदस्य महेश काबरा, प्रणव भुतडा, विवेक मणियार, हार्दिक लोया, प्रणव मणियार, वरद जाजू, श्रेयस परताणी, प्रणव काबरा, शुभम दाड, वरुण भूतडा, अक्षत राठी, अभिषेक जाजू आणि विनय मंत्री यांनी परिश्रम घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अशा प्रकारची सेवाकार्ये समाजात सकारात्मक विचार, चांगले संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचे प्रतीक मानली जातात. आजच्या तरुण पिढीने एकत्र येत अशा आरोग्य शिबिरांचे नियोजन करणे कौतुकास्पद आहे. हे शिबीर केवळ आरोग्य सेवेचे माध्यम बनले नाही, तर संपूर्ण समाजाला एका सूत्रात बांधणारे प्रेरणादायी उदाहरण ठरले असून, भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प या प्रसंगी संयोजकांनी व्यक्त केला.

Post Views: 1,643
Please Share
Previous Post

यशवाडी दुर्घटना : मृतांच्या वारसांना मोठा दिलासा

Next Post

हिंगोलीत भूकंपाचे सलग चार धक्के; परभणीतही सौम्य हादरे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
हिंगोलीत भूकंपाचे सलग चार धक्के; परभणीतही सौम्य हादरे

हिंगोलीत भूकंपाचे सलग चार धक्के; परभणीतही सौम्य हादरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ