पंचक्रोशीतील भाविकांची दर्शनासाठी गर्दी
हातनूर : पवित्र श्रावण सोमवारच्या निमित्ताने श्री क्षेत्र हातनूर येथील नागनाथ भगवान मंदिरात नयनरम्य फुलांची सजावट करण्यात आली. ही सजावट संतोष वाघमारे आणि गोपीनाथ वाघमारे यांच्या वतीने करण्यात आली. पंचक्रोशीतील भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती.
सजावटीच्या कामासाठी बालासाहेब शेळके, वसंत आंधळे, बाळू नागटीळे, भुजंग काकडे, विष्णू सज्जन, रामेश्वर गोरे, रमेश सज्जन, परमेश्वर आद्रट तसेच पोलीस पाटील रामचंद्र पारवे यांनी विशेष परिश्रम घेतले. या आकर्षक सजावटीमुळे मंदिर परिसरातील वातावरण अत्यंत प्रसन्न आणि भक्तीमय झाले होते.





