देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणीत ‘आंबेडकरी जलसा महोत्सव’ उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 31, 2026
in परभणी
0
परभणीत ‘आंबेडकरी जलसा महोत्सव’ उत्साहात
Please Share

महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त आयोजन

शाहिरी परंपरेतून सामाजिक प्रबोधनाचा जागर; विद्रोही कवी, विचारवंत व कलावंतांची मोठी उपस्थिती

परभणी : लोककलावंत शाहीर विकास मंडळ, परभणी यांच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त सोमवारी, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी ‘आंबेडकरी जलसा महोत्सव २०२६’ चे उत्साहात आयोजन करण्यात आले. आंबेडकरी विचार, सामाजिक प्रबोधन आणि शाहिरी परंपरेला उजाळा देत या महोत्सवाच्या माध्यमातून महाकवी वामनदादा कर्डक यांच्या प्रबोधनात्मक कार्याला अभिवादन करण्यात आले.

या वेळी बोलताना विद्रोही कवी यशवंत मकरंद यांनी, “तुमचा प्रत्येक शब्द प्रज्ञासूर्याला अर्पण, बाबासाहेबांचे रूप पाहण्या वामन नावाचे दर्पण…” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. महाकवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून समाजात समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचा विचार पोहोचविण्याचे मोलाचे कार्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांच्या गीतांचे मोठे योगदान राहिले आहे.या महोत्सवामध्ये शाहिरी जलसा, सामाजिक प्रबोधन, आंबेडकरी विचारांचे सादरीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. ‘विचार, शाहिरी आणि प्रबोधन’ या त्रिसूत्रीवर आधारित या उपक्रमातून नव्या पिढीला वामनदादांच्या साहित्याची ओळख करून देण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बी. एच. सहजराव होते. प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त राजू एडके, तर प्रमुख पाहुणे म्हणून मनपा सदस्य आकाश लहाने, विद्रोही लेखक यशवंत मकरंद, कलावंत शेषराव नाईकवाडे, रेखा मनेरे, गायिका भारती राऊत, बळीराम आरगडे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोककलावंत शाहीर विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शाहीर काशिनाथ उबाळे, उपाध्यक्ष किसन सावने, सचिव सुरेखा साळवे, सहसचिव विजय घोडके, कोषाध्यक्ष नामदेवराव ढेपे, सदस्य भास्कर कांबळे, संतोषी भांगे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, साहित्यिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,417
Please Share
Previous Post

हातनूर येथील श्री नागनाथ मंदिरात आकर्षक फूलसजावट

Next Post

आदिवासी भूमिहीन शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे द्यावेत : सीमा राठोड

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
आदिवासी भूमिहीन शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे द्यावेत : सीमा राठोड

आदिवासी भूमिहीन शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे द्यावेत : सीमा राठोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ