देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नागरिकांच्या हितासाठी माहिती अधिकार कायदा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 29, 2025
in परभणी
0
नागरिकांच्या हितासाठी माहिती अधिकार कायदा
Please Share

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे प्रतिपादन

परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, २९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. माहिती अधिकार अधिनियम-२००५ हा कायदा नागरिकांच्या हितासाठी करण्यात आला आहे. या कायद्याची प्रत्येक कार्यालयाने जबाबदारीने अंमलबजावणी करावी. या कायद्यातील तरतूदी समजून घेऊन नागरिकांना वेळेत माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव, अरुणा संगेवार आणि यशदाचे माहिती अधिकार कायद्याचे तज्ञ गणेश तायडे उपस्थित होते.जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण पुढे म्हणाले की, शासन हे नागरिकांसाठी काम करते. त्यामुळे शासकीय कार्यालयात करण्यात येणारे काम जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना माहिती अधिकार अधिनियम-२००५ कायद्यान्वये देण्यात आला आहे. या कायद्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करणे हे प्रत्येक कार्यालयाचे कर्तव्य आहे. त्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित अभ्यास करावा. आपल्या कार्यालयातील अभिलेखे, दैनंदिन कामकाजासंबंधीची कागदपत्रे काळजीपूर्वक जतन करावीत. अद्यावत ग्रंथालयाप्रमाणे अभिलेखे व्यवस्थित ठेवावेत. संगणक व एआय तंत्राची यासाठी मदत घ्यावी, जेणेकरून नागरिकांना माहिती देणे सुलभ होईल. मात्र या कायद्याचा कुणीही दुरुपयोग करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.माहिती अधिकार तज्ञ श्री. तायडे यांनी माहिती अधिकार अधिनियम-२००५ कायद्याची पार्श्वभूमी, उद्देश व महत्त्व विषद केले. सूत्रसंचालन श्रीमती भालेराव यांनी केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post Views: 1,231
Please Share
Previous Post

जिल्हाधिकाऱ्यांनी दिला बाधितांना धीर

Next Post

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण दिवाळीनंतर

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण दिवाळीनंतर

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण दिवाळीनंतर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ