देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा‌‌

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 15, 2026
in परभणी
0
मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा‌‌
Please Share

शिवसेना उबाठा पक्षाचे परभणीत जनआंदोलन; रखडलेल्या विकासकामांवरून सरकारवर तोफ

परभणी : मराठवाड्यात पावसाने महिन्याहून अधिक काळ ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असून पिके पूर्णपणे करपून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १३ सप्टेंबर रोजी “मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा” जनआंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी सरकारवर कडाडून टीका केली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त केवळ पोकळ घोषणा केल्या जातात, मात्र प्रत्यक्षात सिंचन, आरोग्य व शिक्षणाचा अनुशेष कायम असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे मोठे नुकसान झाले असून दुष्काळी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा अशी मागणी त्यांनी लावून धरली. तसेच आरक्षण प्रश्नावरून सरकार मराठा व धनगर समाजाकडे केवळ मतपेटी म्हणूनच पाहत असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील, माजी आमदार मीरा रेंगे, महापौर सय्यद इकबाल, डॉ.विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, विष्णू मुरकुटे, अंबिका डहाळे, माजूलाला, अरविंद देशमुख, शिवलिंग बोधणे, प्रभू जयस्वाल आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणीतील समांतर पाणीपुरवठा, शासकीय रुग्णालय, सिंचन प्रकल्प, रेल्वे दुहेरीकरण व जिंतूर बायपास यांसारख्या रखडलेल्या कामांचा जाब विचारत, हक्काचा विकास निधी मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा आमदार दानवे, डॉ.पाटील आणि आंदोलकांनी दिला.

Post Views: 1,307
Please Share
Previous Post

गणरायांचे उत्साहात स्वागत; भक्तांच्या उत्साहाला उधाण

Next Post

प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या तेजश्री चौधरीची विभागस्तरासाठी निवड

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या तेजश्री चौधरीची विभागस्तरासाठी निवड

प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या तेजश्री चौधरीची विभागस्तरासाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत अभियंता दिन उत्साहात साजरा

सेलूत अभियंता दिन उत्साहात साजरा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 16, 2026
0

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी तंत्रज्ञान पोहोचविण्याचा संकल्प सेलू : भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या १६५ व्या जयंतीनिमित्त सेलू येथे अभियंता...

गणेशोत्सव व्याख्यानमाला : सेलूत २१ सप्टेंबरपासून विविध कार्यक्रम

गणेशोत्सव व्याख्यानमाला : सेलूत २१ सप्टेंबरपासून विविध कार्यक्रम

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 16, 2026
0

वैचारिक व सांस्कृतिक पर्वाची ६५ वर्षांची परंपरा सेलू जि.परभणी : गणेशोत्सवात ज्ञान-विज्ञान, मनोरंजन आणि ज्वलंत सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन व्हावे, या...

पिके करपली; पण जायकवाडीचे पाणी ओढ्या-नाल्यात

पिके करपली; पण जायकवाडीचे पाणी ओढ्या-नाल्यात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 16, 2026
0

पाथरीत अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरूद्ध संताप पाथरी : जायकवाडी उपविभागाचे उपअभियंता व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कालवा क्रमांक ५९ चे पाणी शेतकऱ्यांच्या शेताऐवजी...

राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत लातूरचा डंका

राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत लातूरचा डंका

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 16, 2026
0

सेलूत प्रा.शंकर गंधम सर यांच्या स्मृतिनिमित्त आयोजन : ठाणे, बुलढाणा, मुंबई व नांदेडचेही विविध गटांत यश सेलू : टग ऑफ...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ