देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

धनगर समाजाचा ‘ढोल बजाव’ चा इशारा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 27, 2025
in परभणी
0
धनगर समाजाचा ‘ढोल बजाव’ चा इशारा
Please Share

एसटी आरक्षणासाठी सरकारला २९ सप्टेंबरचा अल्टिमेटम, सेलू येथील तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

सेलू : धनगर समाजाला संविधानिक एसटी (ST) आरक्षण तात्काळ लागू करावे, या मागणीसाठी समाज आक्रमक झाला असून त्यांनी येत्या २९ सप्टेंबर २०२५ रोजी सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांच्या घरासमोर ‘ढोल बजाव’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात २६ सप्टेंबर रोजी सेलू् येथील उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे. तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांनी निवेदन स्वीकारले.या आंदोलनाची सुरुवात जालना येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाने झाली आहे, परंतु सरकारने त्याची दखल न घेतल्याने समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत.धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी जालना येथे दिनांक १७ सप्टेंबर २०२५ पासून दीपक बोऱ्हाडे आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र, उपोषणाला दहा दिवस होऊनही शासनाचा कोणताही प्रशासकीय अधिकारी किंवा मंत्री यांनी याची साधी दखलही घेतलेली नाही. सरकारच्या या उदासीन भूमिकेमुळे समाजबांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.या तीव्र भावना लक्षात घेऊन, धनगर समाजाने सेलू उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करून २६ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन केले. या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, २९/०९/२०२५ रोजी सर्व सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येईल आणि यापुढेही विविध आंदोलनांच्या माध्यमातून लढा सुरूच राहील. सरकारने जालना येथील उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन धनगर समाजाला त्वरित न्याय द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनावर भीमराव हारके, भागवत दळवे, माऊली चौरे, रामचंद्र शिंदे, प्रकाशराव मुळे, आनंद डोईफोडे, विजय दळवे, दामोधर दळवे, रमेश धापसे, सोपान हारके, सुदाम रोकडे, गोविंदराव शिंदे, अशोक खताळ, पांडुरंग रोकडे, तुकाराम महाजन आदी प्रमुख कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Post Views: 1,211
Please Share
Previous Post

‘तुम्ही एकटे नाहीत, सरकार पाठीशी’

Next Post

नागरिकांनी सुरक्षितस्थळी राहावे : जिल्हाधिकारी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नागरिकांनी सुरक्षितस्थळी राहावे : जिल्हाधिकारी

नागरिकांनी सुरक्षितस्थळी राहावे : जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१३ ऑगस्टपासून दररोज रात्री ९ वाजता कार्यक्रमाचे आयोजन वालूर | प्रतिनिधी : सद्गुरु श्रीधुंडामाराज देगलूरकर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने चातुर्मास्य...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ