देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

दुधना कालव्यात तरुण वाहून गेला

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 18, 2025
in परभणी, मराठवाडा
0
दुधना कालव्यात तरुण वाहून गेला
Please Share

सेलूजवळील सोनवटी शिवारातील घटना; पोलिसांकडून शोधमोहीम सुरूच

सेलू : सेलू तालुक्यातील मौजे सोनवटी शिवारात बांधकामावर मजूर म्हणून काम करणारा साजिद मजीद शेख हा १७ वर्षांचा तरुण गुरुवारी सायंकाळी कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्रभर शोधमोहीम हाती घेण्यात आली मात्र यश आले नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम तीव्र केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दिली.राजमोहल्ला भागातील रहिवासी असलेला साजिद हा व्यंकटी धुमाळ यांच्या बांधकामावर कामाला होता. सायंकाळी ५.०० वाजताच्या सुमारास तो शौचास जाण्यासाठी सोनवटी शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यापाशी गेला होता. पाणी घेण्यासाठी कालव्यात उतरला असता, त्याचा पाय घसरला आणि पाण्याचा वेग जास्त असल्याने तो प्रवाहाबरोबर वाहून गेला.या दुर्घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिस ठाणे येथील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपनिरीक्षक राऊत यांच्यासह पोलिस हवालदार क्रमांक सूर्यवंशी, पोलिस शिपाई आघाव आणि डुबे यांनी शोधमोहीम सुरू केली. या कार्यात सोनवटीचे पोलीस पाटील माणिकराव सोळंके, हातनूरचे पोलीस पाटील रामचंद्र पारवे, स्थानिक ग्रामस्थ आणि तरुणाच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली.कालव्यातील पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने आणि रात्रीच्या वेळी अंधार पसरल्याने शोधकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. बराच वेळ शोध घेऊनही साजिदचा पत्ता न लागल्याने रात्री ही मोहीम थांबवण्यात आली होती. गुरुवारी सकाळी पुन्हा पोलिस प्रशासनाने स्वतः घटनास्थळी भेट देऊन शोधमोहीम तीव्र केली आहे. पाण्याचा प्रवाह लक्षात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत असून, अद्याप शोध सुरूच असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दिली आहे.

Post Views: 1,640
Please Share
Previous Post

युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू राहणार

Next Post

कालव्यात बुडून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
कालव्यात बुडून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

कालव्यात बुडून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ