देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

कालव्यात बुडून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 18, 2025
in परभणी
0
कालव्यात बुडून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू
Please Share

सोनवटी शिवारातील दुर्दैवी घटना; १८ तासांच्या शोधमोहिमेनंतर हाती लागला मृतदेह

सेलू : कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने घराचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा कालव्यात पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शेख साजीद शेख माजिद रा. राजमोहल्ला, सेलू असे या दुर्दैवी मृताचे नाव आहे. बुधवारी, १७ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तो सोनवटी गावाजवळील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात पाणी घेण्यासाठी उतरला असता पाय घसरून पाण्यात पडला.साजीद हा सोनवटी येथे व्यंकटी धुमाळ यांच्या बांधकामावर मजुरीचे काम करत होता. सायंकाळी शौचास गेल्यानंतर बराच वेळ तो परतला नाही, त्यामुळे शोधाशोध सुरू झाली. कालव्याच्या काठावर खुणा आढळल्याने तो पाण्यात वाहून गेल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस ठाणे येथील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राऊत, हवालदार सूर्यवंशी, पोलीस शिपाई आघाव आणि डुबे यांनी शोधमोहीम सुरू केली.कालव्यातील पाण्याचा वेग आणि रात्रीचा अंधार यामुळे शोधकार्यात अडथळे आले. गुरुवारी, १८ डिसेंबर रोजी सकाळी पुन्हा पोलीस पाटील माणिकराव सोळंके, रामचंद्र पारवे, ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी शोध सुरू केला असता कालव्याच्या खोल पाण्यात साजीदचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. कष्टाळू तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post Views: 1,611
Please Share
Previous Post

दुधना कालव्यात तरुण वाहून गेला

Next Post

चर्चा तर होणारच : सत्तारोहणाचे ‘सोशल ट्रेंड’ पुन्हा चर्चेत

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नगरपरिषद निवडणूक : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

चर्चा तर होणारच : सत्तारोहणाचे 'सोशल ट्रेंड' पुन्हा चर्चेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ