देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

डॉ.प्रताप काळे महसूल विभागातील ‘भिष्मपितामह’

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
November 1, 2025
in परभणी, मराठवाडा
0
डॉ.प्रताप काळे महसूल विभागातील ‘भिष्मपितामह’
Please Share

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे गौरवोद्गार, अपर आयुक्तपदी पदोन्नतीबद्दल डॉ.काळे यांना निरोप

परभणी : अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांची पदोन्नतीने छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयुक्त (क्रमांक एक) या पदावर नुकतीच पदस्थापना झाली. त्यांच्या या पदोन्नतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी निरोप समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण बोलताना म्हणाले की, “डॉ. प्रताप काळे हे महसूल विभागातील ‘भिष्मपितामह’ आहेत. त्यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीमुळे परभणीचे प्रशासन अधिक सक्षम झाले आहे.”

पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनीही डॉ. काळे यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जनता आणि प्रशासन केंद्रबिंदू

डॉ. काळे यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले की, परभणीतला माझा कार्यकाळ अतिशय आनंददायी होता. प्रशासन आणि जनता हे माझे केंद्रबिंदू राहिले. समाधान देणारे आणि लोकाभिमुख प्रशासन करणे हेच माझे ध्येय राहिले आणि आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी सांगितले की, डॉ. काळे यांनी परभणीत अपर जिल्हाधिकारी म्हणून उल्लेखनीय कार्य केले. निवडणूक, ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम, सौर पंप योजना, कोतवाल व पोलीस पाटील भरती, शंभर दिवस उपक्रम तसेच ई-केवायसी अभियानात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. यावेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने डॉ. काळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार राजकुमार राठोड यांनी केले. कार्यक्रमास मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, श्रीमती ढालकरी, उपजिल्हाधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी तसेच महसूलसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

डॉ.काळे यांच्या पदोन्नतीबद्दल सेलूमध्ये आज अभिनंदन सोहळा

सेलू : परभणीचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप विमल सुग्रीव काळे यांची अपर विभागीय आयुक्त म्हणून छत्रपती संभाजीनगर विभाग येथे नियुक्ती झाली आहे. या आनंदाच्या निमित्ताने त्यांच्या अभिनंदनाचा व शुभेच्छांचा सोहळा सेलू येथे आयोजित करण्यात आलेला आहे. हा सोहळा शनिवारी, एक नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी सात वाजता होणार आहे.हा सोहळा श्री साईबाबा मंदिर सभामंडप, महेश नगर, सेलू, जिल्हा परभणी येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक डॉ.ऋतुराज साडेगावकर आणि मुकुंद आष्टीकर यांनी केले आहे. यानिमित्ताने संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले आहे. असे आयोजकांनी कळविले आहे.

Post Views: 1,723
Please Share
Previous Post

सेलूमध्ये ‘एकता दौड’ उत्साहात

Next Post

अक्षर साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अक्षर साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

अक्षर साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ