देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

संघर्षातून जीवन फुलते : डॉ.स्मिता देऊळगावकर

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 26, 2026
in परभणी
0
संघर्षातून जीवन फुलते : डॉ.स्मिता देऊळगावकर
Please Share

सेलू येथील एक दिवस एक पुस्तक उपक्रमाचे ३८ वे पुष्प उत्साह

सेलू : प्रा.आशा आपराद लिखित ‘भोगिले जे दुःख त्याला’ या आत्मचरित्रात लेखिकेने सहन केलेले दुःख, अन्याय आणि अत्याचार यांचे वास्तववादी चित्रण केले आहे. संघर्ष हेच जीवन आहे, पण संघर्षातून मृत्यू येत नाही तर जीवन फुलते. आपले जीवन बदलायचे असेल तर शिक्षण हीच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे, हेच या आत्मचरित्रातून शिकायला मिळते, असे प्रतिपादन प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.स्मिता देऊळगावकर यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित एक दिवस एक पुस्तक उपक्रमाचे ३८ वे पुष्प बुधवारी (२५ मार्च) गुंफण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम महसूल अधिकारी भाग्यश्री किर्तनकार होत्या. प्रमुख व्याख्यात्या म्हणून बोलताना डॉ. देऊळगावकर पुढे म्हणाल्या की, प्रा.आशा आपराद यांच्या वाट्याला बालपणापासूनच अपमान आणि उपेक्षा आली. त्या घरच्यांना नकोशा होत्या, तरीही त्यांनी जीवनाकडे सकारात्मकतेने पाहिले. अपघात, आजारपण आणि गुलामीची वागणूक या चक्रव्यूहात त्यांचे विचारचक्र सुरू झाले. पुढे त्यांनी शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. शिक्षणशास्त्राची पदवी घेताना त्यांना स्वतःमधील सुप्त गुणांची जाणीव झाली आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला. शिक्षणामुळेच त्यांचे जीवन बदलून गेले. आशा आपराद यांचा हा जीवन प्रवास आपल्याला कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत हार न मानता जगण्याची प्रेरणा देतो.या कार्यक्रमात डॉ.सविता संजय रोडगे यांची जिल्हा परिषद सदस्यपदी निवड झाल्याबद्दल वसुधा महेश खारकर व कुंदा चंद्रशेखर मुळावेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शरद ठाकर यांनी केले, सूत्रसंचालन मनीषा पांडे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. भाग्यश्री धामणगावकर यांनी केले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, ग्रंथालयाचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, डॉ. हर्षा माकोडे, डॉ. सविता साडेगावकर, करुणा बागले यांची उपस्थिती होती.

Post Views: 1,683
Please Share
Previous Post

मुलांचे कल आणि बुद्धिमत्ता ओळखूनच करिअर निवडा

Next Post

इंधन विक्री मर्यादेचे आदेश मागे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
इंधन विक्री मर्यादेचे आदेश मागे

इंधन विक्री मर्यादेचे आदेश मागे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ