देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सील केलेले गाळे तत्काळ मोकळे करा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 4, 2026
in परभणी
0
सील केलेले गाळे तत्काळ मोकळे करा
Please Share

उच्च न्यायालयाचा सेलू नगरपरिषदेला दणका; गाळेधारकांना पूर्ववत ताबा देण्याचे निर्देश

सेलू : सेलू नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे रद्द केलेले गाळे वाटप आणि त्यावर मारलेले सील या संपूर्ण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने नगरपरिषद प्रशासनाला तीव्र शब्दांत खडसावले आहे. न्यायालयाने सेलू नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना फटकारत, सील केलेले गाळे तत्काळ मोकळे करून मूळ गाळेधारकांचा ताबा पूर्ववत प्रस्थापित करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत, अशी माहिती अ‍ॅड. अनिरुद्ध जोशी यांनी दिली.

वर्षे २०२५-२०२६ मध्ये सेलू नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी ठराव क्र. १८० (दि. २७/०१/२०२५) अन्वये शहरातील काही व्यावसायिकांना उदरनिर्वाहासाठी गाळे रीतसर अधिमूल्य व भाडे आकारून पालिकेकडून वाटप केले होते. परंतु, मुख्याधिकारी महेश गायकवाड यांनी पूर्वसूचना किंवा नोटीस न देता एकतर्फी पद्धतीने हे वाटप रद्द करण्याचा आदेश (दि. ३०/०६/२०२६) जारी केला. तसेच भगवान सुभाष चव्हाण, नंदकिशोर रामेश्वर दायमा व पुरुषोत्तम श्रीनिवास चोबी या कर्मचाऱ्यांची समिती स्थापन करून गाळे सील करण्याची कारवाई केली. या एकतर्फी कारवाईविरोधात गाळेधारक वैभव वाघमारे व इतरांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका (क्र. २३३९१/२०२६) दाखल केली. उच्च न्यायालयाने १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजताच नगरपालिकेच्या या कारवाईला स्थगिती दिली होती. परंतु, न्यायालयाच्या स्थगिती आदेशाची प्रत हाती मिळाली नसल्याचा कांगावा करत मुख्याधिकारी व पालिका कर्मचाऱ्यांनी घाईघाईने त्याच दिवशी गाळे सील केले. यानंतर गाळेधारकांनी ई-मेल, नोटिसा आणि पत्रव्यवहाराद्वारे न्यायालयाच्या आदेशाची वारंवार जाणीव करून देऊनही प्रशासनाने गाळे सीलच ठेवले. अखेर या न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी दिवाणी अर्ज (क्र. १००१९/२०२६) दाखल करण्यात आला. दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने नगरपालिकेच्या या बेकायदेशीर आणि मनमानी कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. न्यायालयाने कडक भाषेत खडसावत, प्रशासनाने तत्काळ सील काढून गाळ्यांचा ताबा पूर्ववत गाळेधारकांकडे सोपवावा असा अंतिम आदेश दिला. या संपूर्ण प्रकरणात गाळेधारकांच्या बाजूने अ‍ॅड. अनिरुद्ध जोशी यांनी काम पाहिले. या निर्णयामुळे पालिकेच्या मनमानी कारभाराला चाप बसला असून व्यापाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Post Views: 1,270
Please Share
Previous Post

वाशिम पोलिसांची ‘कॉम्बिंग’ मोहीम; ३२ ठिकाणी एकाचवेळी छापे

Next Post

सेलूतील नमो उद्यानाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूतील नमो उद्यानाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन

सेलूतील नमो उद्यानाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ