देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

वाशिम पोलिसांची ‘कॉम्बिंग’ मोहीम; ३२ ठिकाणी एकाचवेळी छापे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 4, 2026
in वाशिम
0
वाशिम पोलिसांची ‘कॉम्बिंग’ मोहीम
Please Share

दोन फरार आरोपी ताब्यात, शस्त्रसाठा व अवैध दारू जप्त

फुलचंद भगत/वाशिम : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वाशिम पोलिसांनी ३ ते ४ सप्टेंबरच्या रात्री विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत जिल्ह्यातील ३२ संशयित ठिकाणांवर एकाचवेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत दोन पाहिजे/फरार आरोपी ताब्यात घेण्यात आले असून, शस्त्रे, अवैध दारू तसेच संशयित तांदूळ वाहतूक करणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे. आगामी सण-उत्सव शांततेत पार पडावेत, तसेच गुन्हे दाखल असतानाही फरार असलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना कॉम्बिंग गस्त राबविण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक लता फड मंडम यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली.

१६ पथकांची निर्मिती; ३२ ठिकाणी छापे

या विशेष मोहिमेसाठी वाशिम जिल्ह्यातील चार पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी-अंमलदारांची एकूण १६ पथके तयार करण्यात आली होती. पाहिजे व फरार आरोपी, रेकॉर्डवरील आरोपी, आरोपींची लपण्याची संभाव्य ठिकाणे, आश्रयस्थाने तसेच वारंवार चोरीच्या तक्रारी येणाऱ्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

फरार आरोपीकडून शस्त्रसाठा जप्त

शिरपूर पोलीस ठाणे अप.क्र. १८५/२०२५ मधील कलम ३०९(४), ३(५) भारतीय न्याय संहितेतील फरार आरोपी लक्ष्मण मधुकर चव्हाण (रा. पांगरीखेडा, ता. मालेगाव) याचा शोध घेण्यात आला. त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना १ गावठी कट्टा, ५ जिवंत काडतुसे, २ लोखंडी धारदार तलवारी, ६ फरशी कुऱ्हाडी, १० लोखंडी सु-या व कोयते, ५०० फूट केबल, केबल कापण्याचे कटर तसेच सायकलच्या चेनपासून बनविलेले लोखंडी गवती शस्त्र असा एकूण ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.तसेच जुगनू मुसींग पवार (रा. पांगरीखेडा) यांच्या घराच्या झडतीत एक धारदार तलवार व २४ नग देशी संत्रा भिंगरी दारूचे कॉर्टर, किंमत १ हजार ९२० रुपये, आढळून आले. शिरपूर पोलीस ठाणे अप.क्र. २७७/२०२६ मधील पाहिजे आरोपी शंकू गोविंदा पवार (रा. वसारी, ता. मालेगाव) याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घराची झडती घेतली असता विनापरवाना ३० लिटर गावठी हातभट्टीची दारू, अंदाजे किंमत ९ हजार रुपये, जप्त करण्यात आली.

संशयित तांदूळ वाहतूक करणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात

कॉम्बिंग कारवाईदरम्यान वसारी गावाजवळ रोडवर अशोक लेलँड कंपनीचा एमएच ३७ टी २५५७ क्रमांकाचा ट्रक आढळून आला. चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव सतीश महेश कुंजाम (वय २३, रा. लंगापानी, जि. शिवनी, मध्य प्रदेश) असल्याचे सांगितले. ट्रकमध्ये तांदूळ असून तो भंडारा येथे घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. मात्र तांदूळ मालाबाबत कोणतेही अधिकृत पावतीपत्रक उपलब्ध नसल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे ट्रक शिरपूर पोलीस ठाण्यात लावण्यात आला असून, याबाबत योग्य ती चौकशी सुरू आहे.चोरीच्या दुचाकीसह आणखी कारवाई करण्यात आल्या यामध्ये चांडस येथील गंगाराम यामू चव्हाण यांच्या घराची झडती घेतली असता बजाज पल्सर कंपनीची मोटारसायकल आढळून आली. एमएच ०४ आर ८०३४ क्रमांकाच्या या दुचाकीची किंमत सुमारे २५ हजार रुपये असून, मालकी हक्काबाबत कोणतीही कागदपत्रे उपलब्ध झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, बोरगाव येथील संशयित अशोक प्रताप चव्हाण (वय ५०) याच्या घराच्या झडतीत लोखंडी तलवार व किराणा साहित्य आढळले. चौकशीत त्याने चांडस येथील किराणा दुकान फोडून साहित्य चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

विशेष कॉम्बिंग मोहिमेदरम्यान एक फायर आर्म्स व इतर दोन प्रकरणांत मिळून तीन आम्र्स अॅक्टच्या कारवाया, दोन दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाया, दोन पाहिजे/फरार आरोपी ताब्यात घेणे, संशयित तांदूळ ट्रक ताब्यात घेणे तसेच चोरीच्या दुचाकीबाबत कारवाई करण्यात आली.या कारवाईदरम्यान शिरपूर पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, जऊळका पोलीस ठाण्यातही आम्र्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१२ अधिकारी व ८८ अंमलदारांचा सहभाग

ही संपूर्ण मोहीम पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड मंडम यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. मोहिमेत पोलीस निरीक्षक सुधाकर आढे, राजेश खेडे, मपोनि योगिता भारद्वाज, मपोनि श्रद्धेवी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले. या विशेष मोहिमेत एकूण १२ पोलीस अधिकारी आणि ८८ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर वाशिम पोलिसांनी राबविलेल्या या धडक मोहिमेमुळे फरार आरोपींसह गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post Views: 20
Please Share
Previous Post

वाशिम पोलिसांची दमदार कामगिरी; ४८ तासांत फसवणुकीचा गुन्हा उघडकीस

Next Post

सील केलेले गाळे तत्काळ मोकळे करा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सील केलेले गाळे तत्काळ मोकळे करा

सील केलेले गाळे तत्काळ मोकळे करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ