देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूत सामूहिक कवायतीचे शानदार आयोजन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 26, 2026
in परभणी
0
सेलूत सामूहिक कवायतीचे शानदार आयोजन
Please Share

विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी युवकांनी ‘बदलाचे वाहक’ बनावे : उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी

सेलू (प्रतिनिधी) : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिक्षण विभाग, पंचायत समिती सेलू आणि नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने देशभक्तीपर गीतांवर आधारित ‘सामूहिक कवायत’ कार्यक्रमाचे शानदार आयोजन सोमवारी करण्यात आले होते. सेलू शहरातील विविध खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून उपस्थितांचे मने जिंकली.

नूतन विद्यालयाच्या प्रार्थना मैदानावर आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी भूषवले. या प्रसंगी तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, गटविकास अधिकारी उदय जाधव, गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, बालविकास अधिकारी भाऊसाहेब खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संस्थेचे पदाधिकारी डॉ. सत्यनारायणजी लोया, डॉ. विनायकराव कोठेकर, नंदकिशोर बाहेती, महेशराव खारकर, जयप्रकाश बिहाणी, डॉ. शरद कुलकर्णी व मुख्याध्यापक संतोष पाटील, एकनाथ जाधव, जयदत्त बावणे, महिला मंडळाच्या अध्यक्ष विजया कोठेकर आणि विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कवायत सादरीकरणानंतर महिला मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आलां. पांडुरंग पाटणकर यांनी सुंदर रांगोळी काढली होती. या वेळी माजी मुख्याध्यापक काशिनाश वाघमारे यांनी शाळेस संविधान उद्देशिकेची प्रत भेट दिली. डॉ.काशिनाथ पल्लेवाड यांनी उपस्थितांना कॉपीमुक्त परीक्षा आणि साक्षरतेची शपथ दिली. स्वागत गीत सच्चिदानंद डाखोरे आणि संचाने सादर केले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी गजानन वाघणारे यांनी केले. सूत्रसंचालन शंकरराव बोधनापोड यांनी, तर उपस्थितांचे आभार उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे यांनी मानले.

शिस्तबद्ध सादरीकरण

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेली सामूहिक कवायत. देशभक्तीपर गीतांच्या तालावर शेकडो विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि लयबद्ध हालचाली करत उपस्थितांची मने जिंकली. देशप्रेमाची भावना जागृत करणाऱ्या या सोहळ्याने संपूर्ण मैदान दुमदुमून गेले होते. कार्यक्रमास जिजामाता प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र पाठक, स्वामी विवेकानंद विद्यालयाचे एन.बी. एकशिंगे , श्री.के.बा. विद्यालयाचे सिध्दार्थ एडके, नूतन कन्या प्रशालेच्या एन.डी. पाटील, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या सुनिता वेडे, शारदा विद्यालयाचे डी.डी.शिंदे, न्यू हायस्कूलचे धनंजय भागवत, यशवंत विद्यालयाचे रतन थटवले आणि खान अब्दुल खान गफार खान उर्दू शाळांसह विविध शाळांचे पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कवायत समन्वयक किरण राऊत, क्रीडा विभागप्रमुख गणेश माळवे , सुनिता काळे, संजय भुमकर, अंजली पद्माकर यांच्यासह शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

देशभक्तीच भारताला एकत्रित ठेवणारी शक्ती

उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या १५ मिनिटांच्या शिस्तबद्ध कवायतीचे आणि त्यामागील शिक्षकांच्या कष्टाचे विशेष कौतुक केले. लाहोटी यांनी नमूद केले की, भारताच्या आजूबाजूला अनेक देश असूनही केवळ आपल्या देशात असलेली ‘विविधतेत एकता’ हेच आपले सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. अनेक जाती, धर्म आणि भाषा असूनही आपल्याला एकत्रित ठेवणारी एकमेव गोष्ट म्हणजे आपली प्रखर देशभक्ती होय. २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्याचे स्वप्न पाहताना, आजचे विद्यार्थीच भविष्यातील ‘बदलाचे वाहक’ आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रत्येक नागरिकाच्या मनात प्रथम देश, नंतर कुटुंब आणि शेवटी स्वतः ही भावना रुजली पाहिजे, असे सांगून त्यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Post Views: 1,658
Please Share
Previous Post

डॉ.सत्यनारायण लोया यांना जीवनगौरव पुरस्कार

Next Post

सेलूत २ फेब्रुवारीला शिष्यवृत्ती सराव परीक्षा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूत २ फेब्रुवारीला शिष्यवृत्ती सराव परीक्षा

सेलूत २ फेब्रुवारीला शिष्यवृत्ती सराव परीक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ