देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 29, 2026
in परभणी
0
ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन
Please Share

चिमुकल्यांचा बहारदार कलाविष्कार

परभणी : धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी २७ मार्च २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के होते. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ विधिज्ञ कुकडे यांनी केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गंगाबाई सोनटक्के, सचिव प्रा.शितल सोनटक्के, समन्वयक एम. एस. शर्मा, विभाग प्रमुख कदम पी. व्ही., गायकवाड जी. पी., थोरात एस. बी., चाफेकानडे ए. व्ही., सामाले वाय. व्ही. आणि सावंत एम. एस. यांची उपस्थिती होती.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन झाले. सुरसागर गीत संचाने मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक करताना शितल सोनटक्के यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरापर्यंत नेण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास होणे महत्त्वाचे असून, त्यासाठीच या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते. उद्घाटक कुकडे यांनी विद्यार्थ्यांनी जिद्दीने व चिकाटीने परिश्रम करून यश मिळवावे, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना प्रा.किरण सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील प्रत्येक समस्येला धैर्याने सामोरे जाण्याचा आणि स्वावलंबी बनण्याचा सल्ला दिला.याप्रसंगी एन.एम.एम.एस. स्पर्धा परीक्षेत पात्र ठरलेल्या १९ गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्नेहसंमेलनात नर्सरी ते आठवीच्या एकूण ५५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. श्री गणेशाच्या गीताने सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यानंतर कोळी नृत्य, आदिवासी नृत्य, सोन्याची जेजुरी, पिंगा, शिव तांडव, दाक्षिणात्य थीम, सोशल मीडिया ड्रामा, छावा रिमिक्स आणि शेतकरी नृत्य अशा विविध प्रकारच्या २७ नृत्यांनी व संगीतमय नाटकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. अभिनेता धर्मेंद्र यांना नृत्यातून आगळीवेगळी आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. वाय. पत्की यांनी केले, तर आभार एम. एस. शर्मा यांनी मानले. राष्ट्रगीताने या सोहळ्याची सांगता झाली. यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,691
Please Share
Previous Post

सेलूत निवडणूक केंद्रांचे मॅपिंग सुरू

Next Post

निनगुरच्या कालिकादेवीचा सुवर्ण महोत्सवी यात्रोत्सव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
निनगुरच्या कालिकादेवीचा सुवर्ण महोत्सवी यात्रोत्सव

निनगुरच्या कालिकादेवीचा सुवर्ण महोत्सवी यात्रोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ