देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

निनगुरच्या कालिकादेवीचा सुवर्ण महोत्सवी यात्रोत्सव

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 29, 2026
in मराठवाडा
0
निनगुरच्या कालिकादेवीचा सुवर्ण महोत्सवी यात्रोत्सव
Please Share

३० मार्चपासून प्रारंभ, शिवमहापुराण कथेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन

सेलू जि.परभणी : अखिल भारतीय सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाची कुलस्वामिनी श्रीक्षेत्र निनगुर (नेकनूर, ता.जि.बीड) येथील श्री कालिकादेवीच्या सुवर्ण महोत्सवी वार्षिक यात्रा उत्सवास ३० मार्चपासून सुरुवात होत आहे. यानिमित्ताने सोमवार ३० मार्च ते गुरुवार २ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव काटकर व सचिव डॉ.सोनाजीराव पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

यात्रा उत्सवाच्या काळात दररोज सकाळी ६ वाजता सप्तशती पाठ, ७ वाजता अभिषेक आरती आणि ९ वाजता अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता आरती, नैवेद्य आणि आराधना महाप्रसाद होईल. दुपारी २ वाजता श्रीधाम वृंदावन येथील बालव्यास अर्पित कृष्णदास महाराज यांच्या शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य दिवस असलेल्या चैत्र शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच २ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी घोटण देवस्थानचे खजिनदार रमेश रासने राहणार असून दिलीप साळवे, वैशाली झरकर, डॉ.अरविंद लोखंडे, रावसाहेब पाटील आणि जयश्री कंदले आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी रात्री १० वाजता श्रींचा छबीना निघणार असून, रात्री १२ वाजता आतषबाजीने यात्रेची सांगता होईल. भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष शिवाजीराव काटकर, सचिव डॉ.सोनाजीराव पाटील, बंडू निनगुरकर, गणेश कासार, अशोक निनगुरकर, किशोर निनगुरकर, रामनाथ पाथरकर, अरुण व्यवहारे आणि अनिल गोसावी यांसह देवस्थान पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.

वृत्तसंकलन : बाबासाहेब हेलसकर

Post Views: 1,728
Please Share
Previous Post

ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन

Next Post

सेलू पोलिसांवर जमावाकडून दगडफेक

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलू पोलिसांवर जमावाकडून दगडफेक

सेलू पोलिसांवर जमावाकडून दगडफेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ