देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

“केमिस्ट”वरील अन्यायकारक कारवाईबद्दल एमएससीडीएद्वारे खंत

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 15, 2025
in परभणी
0
सेलूत २ फेब्रुवारीला शिष्यवृत्ती सराव परीक्षा
Please Share

परभणी : मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील दूषित खोकल्याच्या सिरपमुळे २० मुलांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील किरकोळ केमिस्टना अन्यायाने लक्ष्य केले जात असल्याची तक्रार महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन (एमएससीडीए) आणि एआयओसीडीने एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

संघटनांच्या मते, ही दुर्घटना औद्योगिक दर्जाच्या ग्लिसरीनमध्ये असलेल्या डाय-इथिलीन ग्लायकॉल या विषारी रसायनामुळे घडली. हे रसायन सिरपमध्ये गोडवा वाढवण्यासाठी एक्सिपियंट म्हणून वापरले गेले होते. ही घटना पहिली नाही. १९३७ पासून अमेरिकेत आणि अलीकडे गॅम्बियामध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्या आहेत. कारण एकच – औषध उत्पादक कंपन्यांनी औद्योगिक दर्जाचे घटक वापरले. जगभरात उत्पादनाची गुणवत्ता विकास टप्प्यातच अंगभूत असावी या तत्त्वावर जोर देण्यात येतो. यासाठी ‘जीएमपी’ (GMP), ‘जीएलपी’ (GLP) आणि ‘जीएसडी’ (GSD) चे पालन आवश्यक आहे. औषधाच्या गुणवत्तेची पूर्ण जबाबदारी उत्पादकावर असते.

अशा घटनांनंतर नेहमीच सामान्य केमिस्टांना अन्यायाने लक्ष्य केले जाते. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी डीसीजीआयने मुलांना खोकल्याचे सिरप देऊ नये अशी सूचना दिली, परंतु ती अजून सर्व केमिस्टपर्यंत पोहोचली नव्हती. तरी दुसर्‍याच दिवशी महाराष्ट्र एफडीएने औषध दुकाने तपासली आणि किरकोळ कारणांवरून परवाने रद्द किंवा निलंबित केले. संघटनांचा दावा आहे की, ही कृती नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन आहे आणि व्यवसायाला मृत्युदंड दिल्यासारखी आहे, अशी खंतही या संघटनेने व्यक्त केली.

ऑनलाइन फार्मसी बेकायदेशीरपणे सिरपची विक्री करत आहेत आणि काही डॉक्टरांकडे मोठ्या प्रमाणात औषध साठे असूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. रात्री किंवा आपत्कालीन परिस्थितीत काही केमिस्ट चांगल्या हेतूने औषधे देतात; त्याच उदाहरणांचा वापर परवाने रद्द करण्यासाठी केला जातो. संघटनांचा असा दावा आहे की, एका अधिकार्‍याच्या निर्णयामुळे अनेक केमिस्ट आणि त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात येतो, आणि हे सगळे दोष उत्पादकांच्या चुकीमुळे होतात, असेही या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, एआयओसीडी व एमएससीडीए यांनी राज्य सरकार, एफडीए आयुक्त आणि डीसीजीआय यांच्याकडे या बाबी तातडीने निदर्शनास आणण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Post Views: 1,100
Please Share
Previous Post

सेवा संस्थेमार्फत पूरग्रस्तांना मदत कीट वाटप

Next Post

परभणी मनपास १५ कोटी ५० लाखांचा निधी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूत २ फेब्रुवारीला शिष्यवृत्ती सराव परीक्षा

परभणी मनपास १५ कोटी ५० लाखांचा निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाटील करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाटील करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ