आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
परभणी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ३५ अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा शुभारंभ परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते सोमवारी, २० जुलै २०२६ रोजी उत्साहात पार पडला.
गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर बससेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली आहे.आमदार डॉ.पाटील यांनी परभणी आगारासाठी १०० राजमाता जिजाऊ बसची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती त्यातील पहिल्या टप्प्यात ३५ बस उपलब्ध झाल्या आहेत लवकरच उर्वरित बस देखील उपलब्ध होतील. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार अशी माहिती यावेळी आमदार डॉ.पाटील यांनी दिली. यावेळी महापौर सय्यद एकबाल, महानगरप्रमुख डॉ.विवेक नावंदर, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, संजय गाडगे, अनिल डहाळे, छगन मोरे, ज्ञानेश्वर पवार, उपविभागीय नियंत्रक सोळंके, गणेश भोसले, रेवनवार, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





