देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा हिंगोली

औंढा येथे प्रभू नागनाथांचा जयघोष

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 16, 2026
in हिंगोली
0
औंढा येथे प्रभू नागनाथांचा जयघोष
Please Share

दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांची गर्दी

परभणी/हिंगोली : महाशिवरात्रीनिमित्त आठवे ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र औंढा नागनाथ (जि.हिंगोली) येथील प्रभू नागनाथांचा मंदिर परिसर महाशिवरात्री निमित्ताने भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला. राज्यासह परराज्यातील हजारो भाविकांनी ‘बम बम भोले’, ‘श्री नागनाथ महाराज की जय’चा जयघोष करत दर्शन घेतले. परिसरातील अनेक भाविक अनवाणी मंदिरामध्ये दाखल झाले होते

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सपत्नीक प्रभू नागनाथास दुग्धाभिषेक करून शासकीय महापूजा केली. तसेच कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनीही सपत्नीक पूजा अर्चा केली. महापूजेनंतर मध्यरात्री २ वाजता मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.मुख्य पुजारी तुळजादास भोपी, पद्माक्ष पाठक, जीवन ऋषी, बंडू पंडित, आबागुरू बल्लाळ, गौरव पुराणिक आणि कल्याण पुराणिक यांनी महापूजेचे पौरोहित्य केले. मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सोयीसुविधेसाठी विशेष नियोजन करण्यात आले. देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे, अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, नायब तहसीलदार प्रवीण ऋषी, तलाठी गजानन गुंजकर, नितीश कुलकर्णी, कृष्णा पाटील, नागेश माने, बबन सोनुने, मुकेश पाडोळे, जगदीश दिंडे, सुरेखा शिंदे, नंदा चोडेकर, शोभा जोशी, देवा देशमुख आणि गणेश जगताप हे मंदिर परिसरात व्यवस्थापनासाठी उपस्थित होते. सुरक्षेसाठी पोलीस निरीक्षक जी.एस.राहिरे आणि सपोनी कैलास भगत यांच्या उपस्थितीत कडक बंदोबस्त तैनात होता. १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे गर्दीवर लक्ष ठेवले जात होते. भाविकांसाठी २५ क्विंटल साबुदाणा खिचडी प्रसाद वाटपाची व्यवस्था करण्यात आली. परभणीतील शिवालयांमध्ये शिवभक्तांनी गर्दी परभणी : महाशिवरात्रीनिमित्त परभणी जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शिवालयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. परभणी शहरातील नांदखेडा रोडवरील प्रसिद्ध श्री पारदेश्वर महादेव मंदिर, सेलू येथील श्री शंकरलिंग मंदिर, श्री हरकेश्वर, श्री साईबाबा मंदिरातील श्री महेश्वर, हातनूरचे श्री नागनाथ भगवान, श्री वाल्मिकेश्वर वालूर तसेच निरवाडी, कुंडी, केदारवाकडी, ढेंगळी पिंपळगाव, गोदाकाठारील श्री रत्नेश्‍वर रामपुरी, मुदगलेश्‍वर महादेव मंदिर, मगर सावंगी संगमावरील महादेव मंदिर, धारासूर येथील श्री गुप्तेश्‍वर, श्रीक्षेत्र त्रिधारा येथील ओंकारेश्‍वर महादेव मंदिर आदी ठिकाणच्या मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती.

Post Views: 1,793
Please Share
Previous Post

श्रीशंकरलिंग भगवंताच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

Next Post

महाशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महाशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पेरण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

महायुतीचे सईद खान विजयी

महायुतीचे सईद खान विजयी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, पहिल्या पसंतीची २४२ मते मिळवून पटकावला विजय; महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांना १५९ मते...

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील घटना; अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर...

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ जून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ