देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

मुख्याध्यापक संतोष पाटील यांचे कार्य गौरवास्पद : प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 31, 2026
in मराठवाडा
0
मुख्याध्यापक संतोष पाटील यांचे कार्य गौरवास्पद : प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी
Please Share

सेवानिवृत्तबद्दल पाटील यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा

सेलू : मुख्याध्यापक हा शाळेचा नेता असतो. शाळेला एक लोकशाही, मुक्तस्वातंत्री आणि सेवाभावी नेतृत्व देण्याचे कार्य त्यांच्याकडून अपेक्षित असते. नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून संतोष पाटील यांनी शांत, संयमीपणे आणि कौशल्याने असेच नेतृत्व शाळेला दिले. यामुळे दहावी आणि विविध परीक्षांचे निकाल उंचावले. शाळेची गुणवत्ता, पटसंख्या वाढली, त्यांचे कार्य गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी केले.

सेलू् येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष व्ही.पाटील यांचा सेवानिवृत्तीबद्दल शुक्रवारी, ३१ जुलै २०२६ संस्थेतर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सेवा गौरव करण्यात आला. त्यावेळी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.कुलकर्णी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडे गुरुजी होते. व्यासपीठावर प्रशासकीय अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, कार्यकारी मंडळाचे सदस्य नंदकिशोर बाहेती, दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, राजेश गुप्ता, गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, सत्कारमूर्ती श्री.पाटील, वंदना पाटील, श्यामलबाई पाटील, उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी वाघमारे, शिक्षक प्रतिनिधी डॉ.सुरेश हिवाळे, वर्षा कदम, डी.बी.घोगरे, बापूराव पानझाडे, रोहित खत्री यांनी तसेच मंदार पाटील यांनी शुभेच्छापर भावना व्यक्त केल्या. संस्थेतील घटक संस्था, पालक शिक्षक संघ तसेच विविध शाळा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी सत्काराद्वारे श्री.पाटील यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात डी.के.देशपांडे यांनी श्री.पाटील यांना शुभेच्छा देत गौरव केला.

कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री.पाटील सेवागौरव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या अंकात के.के.देशपांडे, डॉ.काशिनाथ पल्लेवाड, शशिकांत देशपांडे, भक्ती पाटील आणि संध्या फुलपगार यांनी श्री.पाटील यांच्याविषयी भावना शब्दबद्ध केल्या आहेत.

प्रास्ताविक उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे यांनी केले. मराठी विषयाचे शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून श्री.पाटील यांच्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ संस्मरणीय सेवाकाळावर तसेच विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य योगदानावर त्यांनी प्रकाश टाकला. प्रारंभी सच्चिदानंद डाखोरे यांनी अभंग सादर केला. सूत्रसंचालन शिल्पा बरडे यांनी केले. सरस्वती शेरे यांनी आभार मानले‌. समारंभास विविध शाळांचे आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विविध स्तरांतील नागरिक, पाटील कुटुंबीय, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसोबत शिक्षक घडविणारी संस्था : संतोष पाटील

सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक संतोष पाटील म्हणाले की, नूतन विद्यालय शिक्षण संस्था ही विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक घडविणारी संस्था आहे. सेवा काळात डी.के. देशपांडे यांच्यासह संस्था पदाधिकारी, सहकारी मित्र, पालक आणि सेलूतील विविध क्षेत्रातील नागरिकांचे भरभरून प्रेम मिळाले. याबद्दल सदैव कृतज्ञ आहे.” याप्रसंगी शाळेसाठी मोठी समई, दहा पंखे आणि विद्यार्थी गुणवत्ता पारितोषिकसाठी २१ हजार रुपयांची देणगी श्री.पाटील यांनी संस्थेकडे सुपूर्द केली.

Post Views: 1,549
Please Share
Previous Post

२० कोटींच्या विकासकामांना मंजुरी

Next Post

आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ भरपावसात मोर्चा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ भरपावसात मोर्चा

आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ भरपावसात मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ