सेलूमध्ये सकल मातंग समाजाने वतीने आयोजन
सेलू : सकल मातंग समाजाच्या वतीने आरक्षण उपवर्गीकरणाच्या (अ, ब, क, ड) समर्थनार्थ गुरुवारी, ३० जुलै रोजी भरपावसात तहसील कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो महिला, तरुण आणि मातंग समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दुपारी १२ वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास सुरुवात झाली. क्रांती चौक व गोविंदबाबा चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत तहसील कार्यालय परिसरात मोर्चाचा समारोप झाला. या वेळी कॉम्रेड गणपत भिसे, राधाजी शेळके, राजेश घोडे, डॉ.विलास साबळे, संजूबाबा गायकवाड आणि संदीप दातरे यांनी मोर्चास संबोधित केले. व्यासपीठावर राजू कसबे, भगीरथ गायकवाड व आसाराम घाटुळ उपस्थित होते.
प्रास्ताविक कॉम्रेड अशोक उफाडे यांनी केले तर सूत्रसंचालन कॉम्रेड दत्ताराव तांबे यांनी केले. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी नथुराम अंभुरे, सटवाजी साठे, अर्जुन बावीसे, दीपक चव्हाण, महादेव लोंढे, सतीश जाधव, अशोक पाजगे, अशोक तुरूकझाडे, मारोती बावीशे, बापू बावीसे, शुभम अंभुरे, अरुण थोरात, विष्णू गायकवाड, अरुण हिवाळे, बाबासाहेब वाणी, दशरथ गवारे, रामेश्वर खनपटे, विठ्ठल नाटकर, दीपक कांबळे, कैलास गायकवाड, प्रेम मानवतकर, नितीन बावीसे, सुरेश अवचार, विकास मुजमुले, गणेश रणखांबे, महेश गायकवाड, संजू कारके, लखन कांबळे, श्याम अंभुरे, बालाजी चव्हाण, बजरंग कांबळे, राजू मैरूले, सचिन बावीसे, सनी काळे, पदम काळे, अनिल मुजमुले, किशन बावीसे, परमेश्वर मुजमुले, संतोष रणशिंगे, पवन पौळ, वैभव पौळ, सिद्धार्थ पाटुळे आणि महादू लोंढे यांनी परिश्रम घेतले.





