परभणी : येथील अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांची छत्रपती संभाजीनगर येथे अपर विभागीय आयुक्त या पदावर अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) या पदावर पदोन्नती झाली आहे. या संदर्भातील आदेश २० ऑक्टोबर २०२५ रोजी प्राप्त झाले आहेत.डॉ.प्रताप काळे यांनी परभणीच्या अपर जिल्हाधिकारी पदाचा पदभार ४ नोव्हेंबर २०२२ रोजी स्वीकाराला होता. या पदावरील कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांना पदोन्नती मिळाली आहे. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा
प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....





