देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

शब्दसुरांनी सजली ‘दिवाळी पहाट’

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 20, 2025
in मराठवाडा
0
शब्दसुरांनी सजली ‘दिवाळी पहाट’
Please Share

तुझी सेवा करीन मनोभावे‌ : सेलूतील श्रुती संगीत विद्यालय आणि विनोद बोराडे मित्र मंडळाचा सांस्कृतिक उपक्रम

सेलू : येथील श्री केशवराज बाबासाहेब मंदिरात सोमवार, २० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी सात वाजता ‘दिवाळी पहाट’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रुती संगीत विद्यालय प्रस्तुत आणि विनोद बोराडे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सूरांच्या दीपांनी आणि भावनांच्या सुरावटीने दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यात आला.

आयोजक रवी कुलकर्णी, रवी मुळावेकर व गंगाधर कान्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सुरेल सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली. कार्यक्रमाचे ओघवत्या शैलीतील निवेदन प्राध्यापक संजय पिंपळगावकर यांनी केले.

मुख्य गायक अमोल मोरे यांनी ‘राग मियां की तोडी’ मध्ये झपताल व तीनताल मधील बंदिश, पहाडी रागामध्ये ‘सैयां बिना घर सूना’ ही ठुमरी, ‘शब्दावाचून कळले सारे’ हे भावगीत आणि ‘घेई छंद मकरंद’ हे नाट्यगीत सादर केले. याशिवाय, त्यांनी राग मिश्र जोगवर आधारित ‘तुझी सेवा करीन मनोभावे’ हा अभंग आणि भैरवीमध्ये ‘हेची दान देगा देवा’ या अभंगाचे अप्रतिम सादरीकरण करून सेलूतील संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. या सादरीकरणाला अशोक मोरे आणि ॲड. विशाल मोरे यांनी तबला साथ दिली, तर पूजा तोडकर यांनी हार्मोनियम साथ दिली. सहगायक म्हणून सतीश राठोड व विलास शेरे यांनी साथ दिली.कार्यक्रमाच्या मध्यावर अशोक मोरे आणि ॲड. विशाल मोरे यांनी तीन ताल मधील ‘तबला जुगलबंदी’ सादर करून रसिकांना सुरांच्या अद्भुत अनुभूतीत गुंतवले. यात पारंपरिक बंदिशी, लयकारी आणि तालांच्या विविध प्रयोगांचा समावेश होता. या जुगलबंदीला अमोल मोरे यांनी हार्मोनियम साथ दिली.

यावेळी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी सभापती अशोक काकडे, गोविंद जोशी, प्राचार्य विनायक कोठेकर, जयप्रकाश बिहानी, नंदकिशोर बाहेती, किशोर जोशी, शिवाजी महाराज खवणे आदी मान्यवर उपस्थित होते. संगीत, संस्कृती आणि स्नेहाचा संगम असलेल्या या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाने रसिकांच्या मनात दीपावलीचे आनंददायी पर्व उजळून टाकले आणि सेलूच्या सांस्कृतिक वातावरणात एक सुरेल भर पडली.

Post Views: 1,539
Please Share
Previous Post

सेलूत १६ नोव्हेंबरला परभणी जिल्हा अक्षर साहित्य संमेलन

Next Post

डॉ.प्रताप काळे यांची अपर विभागीय आयुक्तपदी पदोन्नती

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
डॉ.प्रताप काळे यांची अपर विभागीय आयुक्तपदी पदोन्नती

डॉ.प्रताप काळे यांची अपर विभागीय आयुक्तपदी पदोन्नती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ