देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त सेलूत विविध कार्यक्रम

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 31, 2026
in परभणी
0
डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त सेलूत विविध कार्यक्रम
Please Share

सलग १८ तास वाचन, सामान्य ज्ञान स्पर्धा, व्याख्यान, भीमगीतांचा कार्यक्रम

सेलू जि.परभणी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने सेलू येथे पाच एप्रिलपासून विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समितीचे स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष मिलिंद सावंत, अध्यक्ष सुबोध काकडे यांनी ही माहिती दिली.

या संदर्भात नुकतीच नियोजन बैठक पार पडली. बैठकीस परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी भेट देऊन सुसंवाद साधला. पोलीस निरीक्षक दिपक बोरसे यांची उपस्थिती होती. रविवार, ५ एप्रिल रोजी सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत नूतन विद्यालयातील गिल्डा सभागृहात सलग अठरा तास वाचन उपक्रम राबविला जाणार आहे. १२ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर आधारित तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी व अकरावी ते पदव्युत्तर या तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धत सहभागासाठी मुख्याध्यापक सिध्दार्थ एडके (९५६१८७४०६३), गंगाधर अवचार ( ८००७५८१९९१), प्रा. सुमेध आवटे ( ९४२०४३२३८८ ) यांच्याकडे पाच एप्रिल पर्यंत नोंदणी करावी. मंगळवार, १४ एप्रिल रोजी शहरातील नगरपरिषदेच्या समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सकाळी आठ वाजता सामुहिक बुध्द वंदना होणार आहे. २० एप्रिल रोजी साई नाट्यगृहात सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध विचारवंत उत्तम कांबळे (नाशिक) यांचे व्याख्यान होणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ २४ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या भीमगीत गायनाचा कार्यक्रम होईल. सर्व कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन उत्सव समिती आणि संयोजकांनी केले आहे.

Post Views: 1,624
Please Share
Previous Post

रायपूर येथे ७१ जणांचे रक्तदान

Next Post

प्रज्ञा मोरे यांची वैद्यकीय क्षेत्रात भरारी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
प्रज्ञा मोरे यांची वैद्यकीय क्षेत्रात भरारी

प्रज्ञा मोरे यांची वैद्यकीय क्षेत्रात भरारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ