देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

प्रसाद महाराज काष्टे यांचे सेलूत बेमुदत उपोषण

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 15, 2026
in परभणी
0
प्रसाद महाराज काष्टे यांचे सेलूत बेमुदत उपोषण
Please Share

नूतन विद्यालय शिक्षण संस्थेत गैरकारभाराचा आरोप, नूतन इंग्लिश स्कूलचे नाव बदलेपर्यंत उपोषणावर ठाम

सेलू : सेलू येथील नूतन शिक्षण संस्थेत गैरकारभार होत असल्याचा आरोप करीत कीर्तनकार प्रसाद महाराज काष्टे (काजळी रोहिणा ता. सेलू) यांनी गुरुवारपासून (१३ ऑगस्ट) नूतन विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. नूतन इंग्लिश स्कूलला दिलेले बाहेती बिहाणी नाव काढून टाकावे या प्रमुख मागणीसह संस्थेतील कथित बोगस शिक्षक भरती, पावती न देता मनमानी फी वसुली, माहिती अधिकारात मागितलेली माहिती न देणे आदींवरून काष्टे उपोषणाला बसले आहेत.

यासंदर्भात उपोषणस्थळी शुक्रवारी, १४ ऑगस्ट रोजी दुपारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका रोखठोकपणे सविस्तर स्पष्ट केली. दिलेल्या निवेदनातील मागण्यांवर संस्थेने तातडीने कार्यवाही करावी. माझे मुद्दे चुकीचे असतील वा मी चुकत असेल तर, तसे सिद्ध करून दाखवावे. याप्रकरणी प्रसंगी एक पाऊल मागे येऊ; पण नूतन इंग्लिश स्कूलचे नाव बदलण्यावर ठाम असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आगामी काळात अन्य मागण्यांवरही लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील दीड महिन्यापासून समाज माध्यमातून नूतन शिक्षण संस्थेतील अनागोंदी कारभाराविषयी म्हणणे मांडत आहे. त्याला समाजातून सकारात्मक प्रतिसाद आहे. संस्थाचालकांची तीन वेळा भेट घेतली. मात्र मागितलेली माहिती मिळाली नाही, असे त्यांनी सांगितले.

नूतन शिक्षण संस्थेत सेलू शहराचे भाग्यविधाते कै. श्रीरामजी भागडिया, स्वातंत्र्य सेनानी विनायकराव चारठाणकर यांच्यापेक्षा कोणाचेही योगदान मोठे नाही. त्यांच्या नावाचा विचार न होता बिहाणी बाहेती यांचे इंग्लिश स्कूलला नाव देऊन संस्थेने सेलूकरांवर अन्याय केलेला आहे. याची चौकशी शिक्षण विभागाच्या मार्फत केली असता, त्यांच्याकडूनदेखील केवळ आश्वासनच मिळाले आहे. नूतन इंग्लिश स्कूलचे नाव बदलेपर्यंत उपोषणावर ठाम असल्याची भूमिका काष्टे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, बाबासाहेब साखरे हेही या उपोषणात सहभागी झाले आहेत. उपोषणाला विविध क्षेत्रातील नागरिक भेट देत आहेत. दररोज सायंकाळी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Post Views: 1,444
Please Share
Previous Post

स्व.प्रकाशदादा डाहाके निसर्ग पर्यटन केंद्रास पालकमंत्री भरणे यांची भेट

Next Post

नियमांनुसारच कामकाज; विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नियमांनुसारच कामकाज; विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य

नियमांनुसारच कामकाज; विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाबाजानी दुर्रानींचा २४३ कोटींचा महाघोटाळा; जेलची हवा अटळ

बाबाजानी दुर्रानींचा २४३ कोटींचा महाघोटाळा; जेलची हवा अटळ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

आमदार सईद खान यांच्या स्फोटक आरोपाने खळबळ देशनिष्ठ प्रतिनिधी, पाथरी:- "पस्तीस वर्षांची दादागिरी, दहशत आणि लूट जनता दरबारात धुळीस मिळाली....

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

१९ ऑगस्टपर्यंत ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ स्पर्धा स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मृद व जलसंधारण विभागाचे आवाहन वाशिम...

सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

विद्यार्थ्यांच्या देशभक्तिपर मनोगतातून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाशिम : येथील सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला...

यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलात  स्वातंत्र्यदिन उत्साहात

यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

वाशिम:- यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरुळपीर येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी मोतीरामजी ठाकरे...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ