देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

संतवाणी : जाता पंढरीशी…भक्तिरसात श्रोते तल्लीन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 25, 2026
in परभणी
0
संतवाणी : जाता पंढरीशी…भक्तिरसात श्रोते तल्लीन
Please Share

नूतन विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम; किशोरी खवणेचे सुश्राव्य कीर्तन ठरले लक्षवेधी

सेलू : आषाढी एकादशी निमित्त सेलू येथील नूतन विद्यालयाच्या संगीत विभागाच्या वतीने शुक्रवारी, २४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी आयोजित ‘संतवाणी’ या विशेष कार्यक्रमात बाळ गोपाळांनी सादर केलेल्या संतांच्या रचनांनी श्रोते भक्तिरसात चिंब झाले.

कार्यक्रमाची सुरुवात ‘जय जय राम कृष्ण हरी’ जयघोषाच्या समूह गजराने झाली. संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, सचिव प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर, शालेय समिती अध्यक्ष सीताराम मंत्री, दत्तराव पावडे, मुख्याध्यापक एस.व्ही.पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल प्रतिमेचे पूजन झाले. संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात ‘रुप पाहता लोचनी’ (संत ज्ञानेश्वर) आणि ‘सुंदर ते ध्यान’ (संत तुकाराम) या समूह रचनांनी भक्तिमय वातावरणाची निर्मिती केली. भक्ती शिंदे हिने ‘ऊस डोंगा परी’ (संत चोखामेळा), गीत राठोड व नलिनी खंदारे यांनी ‘जाता पंढरीशी’ (संत सेना), तर श्रुती बोकन हिने ‘नको देवराया’ (संत कान्होपात्रा) ही रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. वैभवी कुलकर्णी, ज्ञानेश्वरी शिंदे, अनुष्का परदेशी, अनुवेद घांडगे, मुंगीकर आणि पानझाडे यांनी एकत्रितपणे ‘टाळ बोले चिपळीला’ ही रचना सादर केली.

कार्यक्रमात किशोरी खवणे हिचे सुश्राव्य कीर्तन आणि शौर्य फटाले याची श्री विठ्ठल वेशभूषा विशेष लक्षवेधी ठरली. अनुष्का वाघ हिने ‘कानडा राजा पंढरीचा’ हे भक्तिगीत सादर केले. सानवी शिंदे हिने ‘देवाचिये द्वारी’ (संत ज्ञानेश्वर), ज्ञानाई खवणे हिने ‘अमृताहुनी गोड’ (संत नामदेव), वैष्णवी बोठे हिने ‘खेळ मांडियेला’ (संत तुकाराम), कृष्णा पवार याने ‘कांदा मुळा भाजी’ (संत सावता) आणि श्रुती कुलकर्णी हिने ‘ये गं ये गं विठाबाई’ (संत जनाबाई) या रचनांचे सुंदर सादरीकरण केले. तसेच राधिका परदेशी हिने ‘घागर घेऊन निघाली’ (संत एकनाथ), प्रज्योत पांचाळ याने ‘दिंडी चालली चालली’ (पारंपरिक) आणि ऋतुजा महाजन हिने ‘अरे कृष्णा अरे कान्हा’ (संत एकनाथ),‌ स्वानंद डाखोरे या चिमुकल्याने संत नामदेव यांची “तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल ” रचना सादर करून लक्ष वेधले. श्री.डाखोरे यांनी सादर केलेल्या भैरवी भजनाने सांगता झाली.

कार्यक्रमाचे नेटके निवेदन सान्वी हेलसकर आणि मृण्मयी ईक्कर यांनी केले.‌ तबल्यावर आनंद राऊत, पखवाज, मृदंगावर नागनाथ खवणे आणि टाळावर कार्तिक सातपुते यांनी सुरेल साथसंगत केली. मान्यवरांनी कौतुक केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख काशिनाथ पल्लेवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमास संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहाणी, राजेश गुप्ता, मकरंद दिग्रसकर, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी आदींसह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,809
Please Share
Previous Post

बधिर तरुणाची परतली श्रवणशक्ती

Next Post

पाथरीत युवक काँग्रेसचा धडक मोर्चा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
पाथरीत युवक काँग्रेसचा धडक मोर्चा

पाथरीत युवक काँग्रेसचा धडक मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ