देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

पाथरीत युवक काँग्रेसचा धडक मोर्चा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 25, 2026
in परभणी
0
पाथरीत युवक काँग्रेसचा धडक मोर्चा
Please Share

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

पाथरी : देशभरात नीट परीक्षेशी संबंधित तणावामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वात पाथरी शहर युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी, २४ जुलै रोजी धडक मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.नीट परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना घडत असून त्यामुळे शिक्षण व्यवस्थेबाबत संतापाची लाट निर्माण झाली आहे. या घटनांच्या निषेधार्थ नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे विद्यार्थी संघटना, सामाजिक संस्था व विविध राजकीय पक्ष आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पाथरी शहर युवक काँग्रेसच्या वतीनेही मोर्चा काढण्यात येणार आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता चौक बाजार, पाथरी येथून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारला निवेदन पाठविण्यात आले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज किंवा अश्रुधुराचा वापर करू नये तसेच आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नयेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.दरम्यान, या आंदोलनात शहराध्यक्ष अमोल जाधव, पाथरी शहराध्यक्ष दादाराव गवारे, आरिफ दुर्राणी, पठाण अदनान, सोहेल पठाण, सोहेल अन्सारी, तौसिफ शेख, शेख नविद, शेख अशफाख, ए.बी. राजे, शेख इरफान, अमिर खान, रैफ बसरी, राणा पठाण, शेख वाजेद, विलास कांबळे, इब्राहीम अन्सारी, वैजनाथ महिपाल, अशोक कदम, अमोल लांडगे, अबरार शेख, चंद्रकांत हिवाळे, हमीद खान, हसीब शेख, मिलींद आठवे,परवेज बेग, सय्यद शाहेद, शेख अफसर, अमन शेख, सय्यद अर्श, मुद्दसीर, अन्सारी मुस्तकीम यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Post Views: 1,671
Please Share
Previous Post

संतवाणी : जाता पंढरीशी…भक्तिरसात श्रोते तल्लीन

Next Post

कृषी विद्यापीठात “सिल्क-मिल्क’ कार्यशाळा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
कृषी विद्यापीठात “सिल्क-मिल्क’ कार्यशाळा

कृषी विद्यापीठात "सिल्क-मिल्क' कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

परभणी, दि. २८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण...

बालकलाकारांसाठी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

बालकलाकारांसाठी राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर कलेचे सादरीकरण, दोन फेऱ्यांमध्ये आयोजन, परभणीत २ ऑगस्ट रोजी महोत्सव परभणी : ‘इतिहास महाराष्ट्राचा...

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

विदर्भ, खानदेश आणि कोकणाला हवामान विभागाचा इशारा मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २९ ते ३१ जुलैदरम्यान राज्यात पावसाचा...

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

शिवसेना शिंदे गटाला परभणीत मोठा धक्का

by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 28, 2026
0

दलित आघाडीचे अमित भालेराव यांचा कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश परभणी, दि.२८ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार डॉ. राहुल...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ