देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूकरांचे श्रद्धास्थान श्री जगदंबा देवी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 25, 2025
in परभणी
0
सेलूकरांचे श्रद्धास्थान श्री जगदंबा देवी
Please Share

नवरात्रोत्सवाला २५० वर्षांची परंपरा, विविध कार्यक्रमांचे आयोजन

सेलू : सेलू शहराचे ग्रामदैवत असलेल्या शेरे गल्लीतील जगदंबा देवी भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. या देवीच्या नवरात्रौत्सवाला सोमवार, २२ तारखेपासून उत्साहात प्रारंभ झाला असून, या उत्सवाला सुमारे अडीचशे (२५०) वर्षांची अखंडित परंपरा आहे.

येथील शेरे परिवार हे मातृभक्त असल्याने त्यांनी शेरे गल्लीत जगदंबा देवीचे भव्य मंदिर उभे केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा नवरात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे. मंदिर संस्थानचे अध्यक्ष संपतराव शेरे, बापूसाहेब शेरे, महादेव शेरे यांच्यासह सर्व संचालक मंडळाच्या वतीने उत्सवात सकाळ आणि सायंकाळी आरती, भजन, गोंधळ, भारूड, वाघ्या मुरळी यांसारखे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. पंचक्रोशीत ख्याती असल्याने सेलू शहरासह परिसरातील महिला व भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत आहेत. नवरात्र उत्सवात भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसत असून, परडी भरणाऱ्या महिलांसाठी येथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

जगदंबा देवी स्थापनेची आख्यायिका

या देवीच्या स्थापनेविषयी बापूसाहेब शेरे यांनी आख्यायिका सांगितली. जुन्या काळात सेलू या गावाचे मूळ नाव शाळूवाडी होते, कारण या भागात शाळू (ज्वारी) चे पीक अधिक प्रमाणात घेतले जाई. पुढे शाळूवाडीचा अपभ्रंश होऊन सेलूवाडी आणि नंतर सेलू हे नाव रूढ झाले. अडीचशे वर्षांपूर्वी सेलू शहरात सुभेदारांची गढी होती. त्या पांढऱ्या मातीच्या गढीत जगदंबा देवीची मूर्ती सापडली. शेरे परिवाराने ही मूर्ती शेरे गल्लीतील मंदिरात स्थापित केली. तेव्हापासून नवरात्रौत्सव साजरा करण्याची ही धार्मिक परंपरा शेरे, फोपसे, धापसे, दिग्रसकर, पांडे, कुरेशी यांसारख्या अनेक कुटुंबीयांच्या पुढाकाराने आजतागायत अविरत सुरू आहे.

Post Views: 1,334
Please Share
Previous Post

मंत्री मकरंद पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

Next Post

क्रिकेट स्पर्धेत ‘प्रिन्स’चे निर्विवाद वर्चस्व

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
क्रिकेट स्पर्धेत 'प्रिन्स'चे निर्विवाद वर्चस्व

क्रिकेट स्पर्धेत 'प्रिन्स'चे निर्विवाद वर्चस्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ