देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मंत्री मकरंद पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 25, 2025
in परभणी
0
मंत्री मकरंद पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Please Share

नुकसानग्रस्त भागाची पाहाणी, शेतकऱ्यांना दिला धीर

परभणी : परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यशासनाने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली असून शेतकरी व नागरिकांना निश्चितपणे भरीव मदत केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद (आबा) पाटील यांनी दिली.

श्री. पाटील यांनी आज, गुरूवारी, २५ सप्टेंबररोजी स्वत: परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्राला भेट देऊन पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. या आस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन आपल्या पूर्णपणे पाठीशी आहे. शासनाकडून जास्तीत-जास्त मदत आपल्याला दिवाळीपूर्वी मिळवून दिली जाईल, असा दिलासा त्यांनी शेतकऱ्यांना दिला. श्री. पाटील यांनी आज पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे, गंगाखेड तालुक्यातील धारासुर, परभणी तालुक्यातील साळापुरी, ब्रम्हपुरी गावाच्या शिवारातील पिकांची पाहणी केली. तसेच धानोरा काळे येथील तुडुंब वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्राची पाहणी केली. साळापुरी येथे अतिवृष्टीने घरांची पडझड झालेल्या व सध्या प्राथमिक शाळेत स्थलांतर केलेल्या तेथील कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची आस्थेवाईपणे चौकशी केली व त्यांना शासनाकडून आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, जीवराज डापकर, तहसिलदार, कृषी, पशुसंवर्धन व इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्यशासन अतिशय संवेदनशील आहे. कुठलेही गाव व शेतकरी मदतीपासून वंचित ठेवला जाणार नाही. एनडीआरएफच्या निकषानुसार सध्या शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जात आहे. परंतु अतिवृष्टीने झालेल्या मोठ्या नुकसानीची स्थिती पाहता व शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन अधिकची मदत निश्चितपणे दिली जाईल. पिकांशिवाय घरे, जनावरे याचे जे काही नुकसान झाले आहे, त्यासाठी देखील मदत केली जाईल.

Post Views: 1,186
Please Share
Previous Post

पंचनामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश

Next Post

सेलूकरांचे श्रद्धास्थान श्री जगदंबा देवी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूकरांचे श्रद्धास्थान श्री जगदंबा देवी

सेलूकरांचे श्रद्धास्थान श्री जगदंबा देवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ