देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 2, 2026
in परभणी
0
सेलू तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’
Please Share

वालूर आणि कुपटा येथे महसूल विभागाच्या वतीने विशेष शिबिरांचे आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

सेलू / प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने महसूल विभागाशी संबंधित सेवा तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान – टप्पा १’ चे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत सेलू तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचवण्यासाठी विशेष जनजागृती व प्रसार मोहीम तीव्र स्वरूपात राबवण्यात येणार आहे.या अभियानांतर्गत तालुक्यातील दोन मुख्य ठिकाणी भव्य शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. पहिले शिबीर शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी वालूर महसूल मंडळांतर्गत दुर्गादेवी बाजार मैदान, वालूर येथे पार पडेल. त्यानंतर दुसरे शिबीर शनिवार, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी कुपटा महसूल मंडळांतर्गत जिल्हा परिषद शाळा, कुपटा येथे आयोजित करण्यात आले आहे.शिबिरात मिळणारे प्रमुख लाभ व सुविधा :या समाधान शिबिरामध्ये नागरिकांना एकाच ठिकाणी अनेक शासकीय सेवांचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र आणि नॉन-क्रिमिलेअर यांसारखी विविध आवश्यक प्रमाणपत्रे दिली जातील. शेतीशी संबंधित कामांसाठी ‘ॲग्रीस्टॅक’ अंतर्गत शेतकरी नोंदणी करणे आणि प्रलंबित नोंदणीस मान्यता देण्याची कार्यवाही केली जाईल.तसेच, पीएम किसान योजनेअंतर्गत नवीन लाभार्थी अर्ज स्वीकारणे, लँड सिडिंगच्या त्रुटी दूर करणे आणि लाभार्थ्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यात येईल. शिधापत्रिका (रेशन कार्ड) संदर्भात नवीन नावे नोंदवणे, कमी करणे किंवा ऑनलाईन दुरुस्तीची कामेही याठिकाणी होतील. सामाजिक अर्थसहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारून त्यांची डीबीटी (DBT) प्रक्रिया पूर्ण करून घेण्यावर भर दिला जाणार आहे.७/१२ उतारा व जमीन महसूल सुधारणा :विशेष म्हणजे ‘जिवंत ७/१२’ मोहिमेअंतर्गत मयत खातेदारांच्या वारसांची नावे ७/१२ उताऱ्यावर लावणे आणि प्रलंबित फेरफार निकाली काढून जागीच ७/१२ चे वाटप केले जाणार आहे. यासोबतच महाभूमी पोर्टलवरून डिजिटल ७/१२ डाउनलोड करण्याचे प्रात्यक्षिक नागरिकांना दिले जाईल. तुकडेबंदी कायद्याच्या संदर्भात १५ नोव्हेंबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीतील कमी क्षेत्राच्या जमिनींचे व्यवहार नियमित करण्याबाबतही कार्यवाही केली जाईल. जमिनीच्या अकृषिक (NA) वापराबाबत महसूल अधिनियमात झालेल्या बदलांची माहितीही या शिबिरात दिली जाणार आहे.तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांनी तालुक्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्या नागरिकांना या योजनांचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी योजनानिहाय आवश्यक कागदपत्रांच्या प्रतींसह या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. या मोहिमेची माहिती प्रत्येक गावातील ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Post Views: 1,541
Please Share
Previous Post

महात्मा फुले विद्यालयात विज्ञान दिन उत्साहात

Next Post

सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे समाजप्रबोधनाचे कार्य

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे समाजप्रबोधनाचे कार्य

सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे समाजप्रबोधनाचे कार्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ