देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

वरिष्ठ, निवड प्रशिक्षण २५ ऑक्टोबरपासून

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 7, 2025
in महाराष्ट्र, शेक्षणिक
0
........................ DESHNISHTH https://chat.whatsapp.com/JYZqD00i34UE9pf4sklzYk?mode=ac_t
Please Share

संचालक राहुल रेखावार यांची पत्राद्वारे माहिती, अनुपस्थित शिक्षकांना दिवाळीच्या सुट्टीत प्रशिक्षण पूर्ण करण्याची संधी

परभणी : महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी एक महत्त्वपूर्ण पत्रक निर्गमित केले आहे. वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासंदर्भात हे पत्र सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांना पाठवण्यात आले आहे.

दिवाळीच्या सुट्टीत ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण

मे/जून मध्ये झालेल्या प्रशिक्षणात विविध कारणांमुळे अनुपस्थित राहिलेल्या ५,५२७ प्रशिक्षणार्थींसाठी ही मोठी संधी आहे. तसेच, ज्या प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केले पण प्रशिक्षणोत्तर चाचणीत अनुत्तीर्ण झाले, त्यांच्यासाठी देखील हे प्रशिक्षण पुन्हा आयोजित करण्यात आले आहे.

प्रशिक्षणाचा कालावधी : हे प्रशिक्षण दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ ते दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डीआयईटी) स्तरावर ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येईल.

प्राथमिक, माध्यमिक, उच्व माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील पात्र प्रशिक्षणार्थींसाठी महत्त्वाच्या सूचना :

पुन्हा नोंदणीची, शुल्क भरण्याची गरज नाही : यापूर्वीच नोंदणी केलेल्या कोणत्याही प्रशिक्षणार्थीला पुन्हा नोंदणी करण्याची किंवा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

अनुत्तीर्ण प्रशिक्षणार्थी : दिनांक ०२/०६/२०२५ ते १२/०६/२०२५ या काळात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या, पण चाचणीत अनुत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना याच कालावधीत (२५/१०/२०२५ ते ०३/११/२०२५) पुन्हा प्रशिक्षण पूर्ण करून प्रशिक्षणोत्तर चाचणी द्यावी लागणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

कला व क्रीडा शिक्षक : कला व क्रीडा शिक्षकांचे तालुकास्तरीय ७ दिवसीय प्रशिक्षण नियमित प्रशिक्षण वर्गासोबत दिनांक २५/१०/२०२५ ते ३१/१०/२०२५ (एकूण ७ दिवस) होईल. त्यांचे विभागीय प्रशिक्षण दिनांक ०१/११/२०२५ ते ०३/११/२०२५ या कालावधीत होईल.

अध्यापकाचार्यांचे प्रशिक्षण : अध्यापक विद्यालयातील अध्यापकाचार्यांचे १० दिवसांचे प्रशिक्षण राज्यस्तरावर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत आयोजित करण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय TOT प्राचार्य तसेच व अधिव्याख्याता/केंद्र समन्वयक/ अधिव्याख्याता व सुलभक यांचे समवेत दि ९ ऑक्टोबर रोजी १ दिवशीय ऑनलाईन स्वरुपात पेण्यात येईल
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांनी अनुपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थींच्या गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन दिनांक ९ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना परिषदेने दिल्या आहेत. प्रशिक्षण आणि चाचणी संबंधित अधिक माहिती वेळोवेळी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल, असे पत्रामध्ये म्हटले आहे.

Post Views: 1,368
Please Share
Previous Post

दम्याच्या २५६ रुग्णांना मोफत औषधी

Next Post

शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज

शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ