सेलू : सामाजिक कार्यासाठी आणि वर्तमान परिस्थितीवर निर्भीड व अचूक फेसबुक पोस्ट्स लिहिल्याबद्दल, सेलू येथील रहिवासी आणि ताडबोरगाव येथील राजीव गांधी हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक असलेले शेख महेमुद यांना त्रेतायुग फाउंडेशन, अयोध्या यांच्या वतीने ‘राष्ट्रीय वीररत्न ‘ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित राहणे शक्य नसल्याने, हा पुरस्कार त्यांना पोस्टाने पाठवण्यात आला. यापूर्वीही, त्यांना ‘जीवन गौरव’, ‘मराठवाडा भूषण’, ‘महाराष्ट्र रतन’, ‘आदर्श शिक्षक’, ‘सर्वश्रेष्ठ समाजसेवक’ आणि ‘बेस्ट स्टोरी रायटर’ यांसारख्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. शेख महेमुद यांना ‘राष्ट्रीय वीर रतन’ पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा
प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....





