देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

श्रीमद् भागवत कथेची उत्साहात सांगता

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 4, 2025
in परभणी
0
श्रीमद् भागवत कथेची उत्साहात सांगता
Please Share

सेलूतील व्यंकुशाह यात्रा महोत्सव, शेकडो भाविकांनी घेतला महाप्रसाद

सेलू : शिर्डीचे संत श्री साईबाबांचे सद्गुरू व सेलू शहराचे ग्रामदैवत संत श्री गोपाळकृष्ण केशवराज बाबासाहेब महाराज (व्यंकुशाह) यांच्या २२४ व्या यात्रा महोत्सव निमित्ताने आयोजित श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवारी, ३ डिसेंबर रोजी महाप्रसादाने झाली. या वेळी शेकडो भाविकांनी श्री दर्शन, महाप्रसादासाठी गर्दी केली होती.
यात्रेनिमित्त २७ नोव्हेंबरपासून भागवताचार्य नंदकिशोर महाराज गोंदीकर यांच्या अमृततुल्य व रसाळ वाणीमधून श्रीमद् भागवत कथा निरूपण झाले. सांगताप्रसंगी महाप्रसादाचे यजमान माजी जिल्हा परिषद सभापती अशोक काकडे व शिलाताई काकडे यांच्या हस्ते ग्रंथपूजन, महाआरती झाली.

यावेळी मनोगतात श्री काकडे म्हणाले की, सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या वास्तव्याने सेलू शहर आणि परिसरातील भूमी पावन झालेली आहे. येथे सर्वांना एक सकारात्मक ऊर्जा आणि शक्ती मिळते. चांगले कर्म आणि आचार विचार बळ देत असतात. काकडे परिवाराकडून दरवर्षी महाप्रसादाची ही सेवा अखंड सुरू राहणार आहे.

यावेळी गोंदीकर महाराज, श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिराचे विश्वस्त पुजारी केशवराव मंडलिक, तसेच महाराजांचे वंशज ॲड.लक्ष्मीकांत सुभेदार व रामराव सुभेदार यांचा काकडे यांच्या हस्ते, तर उद्योजक आर.बी.घोडके आणि काकडे यांचा संस्थानच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा.संजय पिंपळगावकर यांनी केले. आरतीनंतर दहा हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महोत्सवानिमित्त दीपाली कुलकर्णी, बालासाहेब नेब महाराज, पुरूषोत्तम महाराज वालूरकर यांचे कीर्तन, भजन विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.

▫️आज यात्रेचा मुख्य दिवस

गुरुवारी, ४ डिसेंबर (श्रीदत्त जयंती) यात्रेचा मुख्य दिवस असून, यानिमित्त दुपारी १२ वाजता महाआरती, महाप्रसाद  आहे. दुपारी तीन वाजता ‘श्रीं’ च्या पारंपरिक पालखी मिरवणूक सोहळ्याला सुरुवात होणार आहे‌. ५ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता भागवतकार सुनील महाराज आष्टीकर यांच्या काल्याचे कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे‌. विविध कार्यक्रमांत सहभागी व्हावे असे आवाहन मंदिर संस्थान, केशव मंडलिक, वामन मंडलिक, पुरुषोत्तम मंडलिक, सुधीर मंडलिक आणि यात्रा समितीने केले आहे.

▫️दोन आठवडे फुलणार यात्रा

आगामी दोन आठवडे यात्रा भरणार आहे. यानिमित्ताने व्यापार वर्गाने विविध प्रकारची दुकाने थाटली आहेत. मनोरंजक, साहसी खेळ आकाश पाळणे, बच्चे कंपनीसाठी विविध खेळणी, क्रॉकरी, गृहोपयोगी वस्तू, महिलांसाठीच्या इमिटेशन ज्वेलरी, सजावटीची साहित्य, कापड, भांडी आदी विविध प्रकाराच्या दुकानांनी यात्रा भरली आहे. दर्शनासाठी तसेच यात्रेचा आनंद घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांच्या गर्दीने परिसर फुलणार आहे. 

Post Views: 1,886
Please Share
Previous Post

सोनपेठमध्ये सर्वाधिक; सेलूत टक्का घसरला

Next Post

श्री ज्ञानेश्वरीच्या इंग्रजी आवृत्तीचे लोकार्पण

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
श्री ज्ञानेश्वरीच्या इंग्रजी आवृत्तीचे लोकार्पण

श्री ज्ञानेश्वरीच्या इंग्रजी आवृत्तीचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ