लातूर येथे वीस सप्टेंबर रोजी होणार गौरव
सेलू : गौरव सेवाभावी संस्था संचलित यासेर उर्दू प्राथमिक शाळा गुलमोहर कॉलनी सेलूचे उपक्रमशील मुख्याध्यापक जावेदखान फेरोजखान पठाण यांची महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना लातूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग यांच्यातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
आपल्या कार्यातून जिल्ह्यात वेगळी ओळख असलेले जावेदखान फिरोजखान पठाण यांना परभणी जिल्ह्यातून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा लातूर येथे २० सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. पठाण यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.





