देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

षडानन देशमाने यांच्या जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचा जल्लोष

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 6, 2026
in परभणी
0
षडानन देशमाने यांच्या जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचा जल्लोष
Please Share

वालूर जिप कन्या शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा; विद्यार्थीनीसह पालक शिक्षकांकडून अभिनंदनाचा वर्षाव

सेलू : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक कन्या शाळा वालूर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार २०२६ प्राप्त झाल्याबद्दल मुख्याध्यापक षडानन शंकरराव देशमाने यांचा गौरव व सत्कार समारंभ शनिवारी, ५ सप्टेंबर २०२६ रोजी जल्लोषात साजरा करण्यात आला. या यशामुळे कन्या शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण वालूर शाळा परिवाराची मान उंचावली आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळीराम धरणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रामभाऊ पाथरकर, रुक्मिणी मगर, स्वाती टेहरे, मौजम आणि कदम यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सानिका रुपनर यांनी केले. प्रास्ताविकातून बबनराव राठोड यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद करून षडानन देशमाने यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला. विद्यार्थिनींच्या वतीने श्रेया शिंगारे व गौरी बिहाडे यांनी मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली. नानासाहेब पवार व कुलकर्णी यांनी देशमाने यांच्या शैक्षणिक बांधिलकीचे आणि शाळेच्या प्रगतीतील योगदानाचे कौतुक केले. मान्यवरांच्या हस्ते षडानन देशमाने व अंजली देशमाने यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनींनी नृत्याच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना हा पुरस्कार वैयक्तिक नसून सहकारी शिक्षक, विद्यार्थिनी, पालक, व्यवस्थापन समिती आणि समाज घटकांचा सहभाग असल्याचे षडानन देशमाने यांनी नमूद केले. शालेय व्यवस्थापन समिती व रामभाऊ पाथरकर यांच्या वतीने शाळेतील सर्व शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.


अध्यक्षीय भाषणात श्री.धरणे यांनी शिक्षकाचे कर्तृत्व विद्यार्थ्यांच्या प्रगतीत प्रतिबिंबित होते असे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रदीप जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. शिक्षक दिन आणि पुरस्कार सोहळ्यामुळे वालूर कन्या शाळेत दुहेरी आनंद साजरा झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,605
Please Share
Previous Post

सेलू तालुक्यातील ४५ विद्यार्थी इस्रो अभ्यास दौऱ्यावर

Next Post

जावेदखान पठाण यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
जावेदखान पठाण यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

जावेदखान पठाण यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ