वसंत आवटे कार्याध्यक्ष, परभणी जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी शिवाजी आकात
सेलू : व्हाइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या सेलू तालुका कार्यकारिणीच्या निवडी साठी संघाच्या सर्व सन्माननीय सदस्यांची शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी, १६ जुलै रोजी जेष्ठ पत्रकार नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.या बैठकीसाठी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष कैलास चव्हाण,ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काळे व जिल्हा कार्याध्यक्ष विजय कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
प्रारंभी सेलूचे तरुण पत्रकार समशेर खान यांचे नुकतेच दुर्दैवी निधन झाल्याबद्दल त्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सर्वांनमते सेलू तालुक्याची कार्यकारिणी निवडण्यात आली. पदाधिकारी व सदस्य याप्रमाणे : अध्यक्ष अशोक अंभोरे, उपाध्यक्ष सचिन हिवरे, मोहन बोराडे, सचिव श्रीपाद कुलकर्णी, कार्याध्यक्ष वसंत आवटे, संघटक संतोष कुलकर्णीकार्यवाह पंकज सोनी, कोषाध्यक्ष रश्मी भदर्गे, सहसचिव -शिवप्रसाद काबरा, प्रसिद्धी प्रमुख – बाबासाहेब हेलसकर, मार्गदर्शक सदस्य – नारायण पाटील, नागोराव देशमुख, जयचंद खोना, प्रसाद खारकर, सदस्य लक्ष्मण सोन्ने, बालाजी सोनवणे, वैभव सोळंके, प्रताप काकडे, शंभू काकडे. यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास चव्हाण यांनी पत्रकार संघाची ध्येय धोरणे व भविष्यात घेण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन व आभार श्रीपाद कुलकर्णी यांनी मानलेजिल्हा कार्यकरिणीकडून नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.





