देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

येलदरी, निम्न दुधनातून मोठा विसर्ग

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2025
in परभणी
0
येलदरी, निम्न दुधनातून मोठा विसर्ग
Please Share

दुधना, पूर्णा नद्यांना पूर, शेतपिकांचे मोठे नुकसान, वाहतूक ठप्प

परभणी : पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसामुळे परभणी जिल्ह्यातील येलदरी आणि निम्न दुधना, हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. यामुळे पूर्णा आणि दुधना या दोन्ही प्रमुख नद्यांना पूर आला आहे. या शिवाय कसुरा, करपरासह लहान मोठ्या नद्या, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. पूरस्थितीमुळे जागोजागी वाहतूक ठप्प झाली आहे. मात्र, काही ठिकाणी पर्यायी रस्त्यावरून वाहतूक केली जात आहे. दरम्यान, धरणातील मोठ्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

येलदरी, सिद्धेश्वरमधून मोठा विसर्ग

जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मंगळवारी टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात आला. दुपारी तीन वाजता सर्व १० दरवाजातून एकूण ३२,१८० क्यूसेक दराने विसर्ग करण्यात येत आहे. येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे आणि खडकपूर्णा धरणातून पाणी सोडल्यामुळे येलदरी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. दुपारी ३.०० वाजता धरणाचे गेट क्रमांक १, ५, ६, आणि १० हे १ मीटरने उघडण्यात आले आहेत.
यामुळे आता धरणातून पूर्णा नदीपात्रात एकूण ३२,१८० क्यूसेक (९११ क्यूमेक) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यापैकी २९,४८० क्यूसेक पाणी स्पिलवे गेटमधून, तर २,७०० क्यूसेक पाणी जलविद्युत प्रकल्पातून सोडले जात आहे. या विसर्गामुळे पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आणि येलदरी धरणातून येणाऱ्या पाण्यामुळे सिद्धेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता धरणाचे १४ दरवाजे उघडून २२,५९८ क्यूसेक (६३९.८९८ क्यूमेक) पाणी पूर्णा नदीत सोडण्यात येत आहे. या दोन्ही धरणांमुळे पूर्णा नदीची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

निम्न दुधनाचे सोळा दरवाजे उघडले

सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्न दुधना धरणातूनही पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आला आहे. या धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले सध्या धरणातून ३०,४१४ क्यूसेक (८६१.२२ क्यूमेक) इतका विसर्ग दुधना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. सुरुवातीला धरणाचे १६ दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आले होते. २७,१०४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत होता. दुपारी ३ वाजता १० दरवाजे (गेट क्रमांक ०२, ०३, ०४, ०५, ०६, १५, १६, १७, १८ आणि १९) आणखी ०.६० मीटरपर्यंत उघडण्यात आले. यामुळे एकूण विसर्ग वाढून ३०,४१४ क्यूसेक झाला आहे.

नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

येलदरी, निम्न दुधना तसेच सिद्धेश्वर धरणांमधून होणाऱ्या मोठ्या विसर्गामुळे दुधना आणि पूर्णा या नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी नदीपात्रात किंवा नदीकाठी जाणे टाळावे आणि कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, येलदरी धरणात ९८.७३ टक्के, सिद्धेश्वर ९७.३९ टक्के, तर निम्न दुधनात ७६.९५ टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी निम्न दुधनात ७५ टक्के साठवण मर्यादा ठेवण्यात आल्याने विसर्ग वाढविण्यात आला आहे.

वाहतूक ठप्प

निम्न दुधना धरणातील विसर्गामुळे दुधना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे मंगळवारी पहाटेपासून सेलू- राजवाडी – वालूर रस्ता बंद झाला आहे. तर कसुरा नदीला पूर आल्याने सेलू – गोहेगाव रस्ता ठप्प झाला आहे. खादगाव मोरेगाव वाहतूकही सायंकाळी बंद झाली होती.

Post Views: 1,265
Please Share
Previous Post

दुधनेला पूर, वालूर रस्ता बंद

Next Post

दुधनाकाठच्या पिकांचे मोठे नुकसान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
दुधनाकाठच्या पिकांचे मोठे नुकसान

दुधनाकाठच्या पिकांचे मोठे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ