देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नूतन कन्या शाळेतील बारावीच्या विद्यार्थिनींना निरोप

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 3, 2026
in परभणी
0
नूतन कन्या शाळेतील बारावीच्या विद्यार्थिनींना निरोप
Please Share

यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक : सर्वेश काबरा

सेलू : कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक असतात. विद्यार्थ्यांनी स्वावलंबी आणि स्वतःशी प्रामाणिक राहायला हवे. आईवडील आणि शिक्षक हेच आपले खरे मार्गदर्शक आहेत, याची जाणीव सदैव ठेवावी, असे प्रतिपादन लेखापाल (सीए) सर्वेश काबरा यांनी केले.

श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल नूतन कन्या उच्च माध्यमिक विभागातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींचा शुभेच्छा आणि निरोप समारंभ ३ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य शरद कुलकर्णी होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. रूपाली होके, मुख्याध्यापक निशा पाटील आणि उपमुख्याध्यापक परसराम कपाटे यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना ॲड. रूपाली होके म्हणाल्या की, शिक्षणामुळे निर्णय घेण्याची क्षमता वाढते. विद्यार्थिनींनी आत्मसंरक्षण आणि मानसिक बळ वाढवण्यावर भर द्यावा. सामाजिक माध्यमांचा वापर सजगपणे करावा आणि आपल्या कर्तृत्वाने शाळेचे व पालकांचे नाव मोठे करावे.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य शरद कुलकर्णी यांनी विद्यार्थिनींनी परीक्षेला न घाबरता सामोरे जावे आणि उच्च शिक्षणातून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे, अशा शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात दिव्या डंबाळे, उर्मिला बनसोडे, भाग्यश्री आल्डे, वैष्णवी मोगल आणि भक्ती कांबळे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. रेणुका अंबेकर यांनी स्वागत गीत सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक निशा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विजय धापसे यांनी तर आभार प्रदर्शन रवींद्र कदम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सपना पाटणी, सुरेखा आगळे, यशवंत कुलकर्णी, सुरेश हिवाळे, भालचंद्र गांजापुरकर, किशोर ढोके, स्नेहल दगडू आणि बालाजी देऊळगावकर यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,707
Please Share
Previous Post

श्री संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सव

Next Post

अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सर्वसमावेशक विकास व दूरदृष्टीचा अर्थसंकल्प

अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ