वाशिम:-भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ या मासिक संवाद कार्यक्रमाचा १३७ वा भाग,भाजप नगरसेवक प्रा. नंदलाल पवार यांच्या निवासस्थानी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमावेळी परिसरातील नागरिक, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे व विविध सामाजिक, पर्यावरण, नवोपक्रम, युवा सक्षमीकरण आणि राष्ट्रहिताच्या विषयांवरील प्रेरणादायी संदेशांचे लक्षपूर्वक श्रवण केले.यावेळी प्रा. नंदलाल पवार यांनी सांगितले की, ‘मन की बात’ हा कार्यक्रम देशातील सकारात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देणारा असून समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. नागरिकांनी अशा उपक्रमांमधून प्रेरणा घेऊन समाजहिताची कामे करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व राष्ट्रभक्तीच्या वातावरणात संपन्न झाला.यावेळी. प्रमोद पाटील,प्रकाश संगत, रामदास मोरे, किशोर इंगोले, बाळासाहेब दिवेकर, रवि ठाकूर,आदि उपस्थित होते.





