आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे यश : प्रा.किरण सोनटक्के
परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारा आयोजित इयत्ता ८ वीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत धर्मापुरी (ता.परभणी) ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे २२ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, सचिव प्रा. शितल सोनटक्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये नक्ष नागनाथ दावलबाजे, आयुष गंगाधरराव ढोके, आरुषी अजय देशमुख, ऋतुजा गजानन सामाले, निखिल सतीश कोरे, नोबल रमेश पेटकुले, विवेक तुकाराम वाघमारे, रितिका दीपकराव कदम, समीक्षा रुस्तुम दीक्षित, शिवम सुरेश पोळ, वेदिका व्यंकटेश जोगदंड, शशिकांत काशिनाथ कोप्रटकर, श्रेयश अविनाश राठोड, इशांत गोपीनाथ गव्हाणे, रामप्रसाद गजानन साळवे, वेदांती गजानन वाघमोडे, आदित्य बालासाहेब पुंड, प्रतीक्षा अनिल रसाळ, ममता राजेश कदम, रजनीश अनिल चव्हाण, गौरव ज्ञानेश्वर उगले आणि करण गोविंद उगले यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे आधुनिक काळात गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन ठेवून ज्ञानसाधना प्रतिष्ठान भविष्यातही असेच अनेक नवे उपक्रम राबवणार असल्याचे ग्वाही प्रा. किरण सोनटक्के यांनी यावेळी दिली.





